दहा कोटी वृक्षलागवड या मोहिमेच्या अनुषंगाने पालम ग्रामीण रुग्णालयात वृक्षारोपण संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 19 जुलाई 2018

दहा कोटी वृक्षलागवड या मोहिमेच्या अनुषंगाने पालम ग्रामीण रुग्णालयात वृक्षारोपण संपन्न.



पालम/अनीस खुरेशी
शशासनाच्या दहा कोटी वृक्षलागवड या मोहिमेच्या अनुषंगाने पालम ग्रामीण रुग्णालयात वृक्षारोपण संपन्न झाले.पालम नगर पंचायतीच्या अध्यक्ष मा.अनिताताई जालिंदर हत्तीअंबीरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसगी त्यांनी पालम येथील ग्रामीण रुग्णालयात वृक्षसंवर्धनासाठी शंभर लोखंडी जाळ्या देण्याचे आश्वासन दिले.तसेच रूग्णकल्याण समीतीचे सदस्य व नगरसेवक वसंतराव सिरस्कर यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व सांगुन मार्गदर्शन केले.पालम ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सिध्दार्थजी भालेराव यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे या काळाप्रमाणे कार्य करावे असे अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.माजी उपसरपंच लक्ष्मणरावजी रोकडे,उपाध्यक्ष गजानन रोकडे,नगरसेवक मंगेश जोंधळे,संजय थिटे,विजय घोरपडे,शेख मुसा भाई,डाॅ.बडेसाहब,,सलमान खान  हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ.संजय सोळंके,डाॅ.सचीन ठोके,डाॅ.प्रेमकुमार,डाॅ.सलमान खान,डाॅ.विनायक वाखरडकर,डाॅ.संदीप भस्के,स्टाफ इंचार्ज निरज मुरळे,स्टाफ नर्स श्रिमती रोहिणी मुंढे,रूपाली चव्हाण,आर आर भुमरे,भुषण कोंडेकर,चंद्रशेखर कस्तुरे,यांनी प्रयत्न केले तसेच अविनाश हनवते,संदीप मुरकुटे,वामन वरवे,बालाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगीराज चावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बळीराम नरवटे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें