मातंग समाजानी जालना येथे आक्रोश मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन- राजीव निकाळजे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 19 जुलाई 2018

मातंग समाजानी जालना येथे आक्रोश मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन- राजीव निकाळजे.


 भोकरदन प्रतिनिधी- महाराष्ट्रात मातंग समाजावर सतत अत्याचार होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची ठिणगी पडली आहे याच पाश्वभूमीवर संपूर्ण जालना जिल्हाच्यावतीने  मस्तगड,जालना येथून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सुरुवात होईल व चमन, शनिमंदिर, नुतन वसाहत या मार्गाने दि. 20 जुलै शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी जालना यांना लहान मुलींच्या हाताने निवेदन देण्यात येणार असून हा मोर्चा शिस्त व शांततेत निघणार असल्याचे संयोजन समितीने कळविले आहे.                 मातंग समाजाच्या मोर्चात संपूर्ण आठही तालुक्यातून मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील महिला,पुरुष व तरुण मंडळीचा सहभाग असून गेल्या पंधरा दिवसापासुन प्रत्येक गावा-गावात, वस्त्यात मोर्चात सहभागी होण्यासाठी बैठका घेवून प्रचार करण्यात आला असून भोकरदन तालुक्यातील जवळपास 90 टक्के गावात तरुणांच्या बैठका घेवून त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.               या मोर्चात रुद्रवाडी, वाकडी, रोहिलागड, भिमा कोरेगांव दंगलीतील साक्षीदार पुजा सगट हिचा खून, अशाप्रकारे अशा विविध ठिकाणी समाजावर  होणाऱ्या आत्याचारा विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे गोद्रीचे मा. सरपंच राजीवभाऊ निकाळजे यांनी भोकरदन तालुक्याच्या  वतीने कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें