सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.१९ ) -
काँग्रेस आघाडी सरकारने गोरगरिबांसाठी सुरु केलेल्या अनेक योजनांची भाजपा सरकारने केवळ फक्त नावेच बदललीत असे नव्हे तर योजनांची अंमलबजावणी शून्य असून असल्याने तळागाळातील सामान्य नागरिकांना या योजनांचा लाभ मिळणेही कठीण झाले आहे. युवकांनी राजकारणात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून गोरगरिबांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
सिल्लोड तालुक्यातील भराडी - अंभई ,उंडणगाव, नानेगाव, मोढा, वांगी, घटांब्री, खुल्लोड, बोजगाव आदि गावांतील नवतरूणांशी संवाद साधतांना
नगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले युवकांनी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता - पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्षांसोबत जोडण्यासाठी व काँग्रेस पक्षाच्या विचारांचा प्रचार - प्रसार व सुचनांसह काँग्रेस पक्षाच्या नविन संकल्पना याविषयी मार्गदर्शन करतांना त्यांनी काँग्रेस पक्षाची नवी युक्ती " प्रोजेक्ट शक्ती " याविषयी चर्चा करीत नवतरूणांनी विविध सामाजिक - सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, राजाराम पाडळे, विठ्ठलराव सपकाळ, दामुआण्णा गव्हाणे, रुपेश जैस्वाल, कृष्णा ऊखर्डे, रईस मुजावर पठाण, राजू गौर, संजय मुरकुटे, अमित आरके, पांडुरंग गवळी, गणेश डकले, करीम भाई, फकिरा रज्जाक आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें