मानवत येथे सकल मराठा समाजाच्यावतीने तहसिल येथे धरणे आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 जुलाई 2018

मानवत येथे सकल मराठा समाजाच्यावतीने तहसिल येथे धरणे आंदोलन.


[]मुकमोर्चा ऐवजी आता ठोकमोर्चाची मराठ्यांची  भुमिका []

( रत्नापुर येथील टोलनाक्याजवळ  अज्ञात व्यक्तिनी बस फोडली )

मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२३: मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षण  व विविध मागण्यासाठी जन आंदोलन सुरु केले असुन जन आंदोलनाचा भाग म्हणुन मानवत तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने मानवत तहसिल कार्यालय येथे आज दि.२३ जुलैरोजी  धरने आंदोलन करुन तहसिलदार निलम बाफना यांना निवेदन देण्यात आले .निवेदनात नमुद केले आहे की,महाराष्ट्र राज्यभर सुरु असलेले  मराठा समाजाच्या विविध मागण्या व आरक्षण संबधी जन आंदोलनाचा भाग म्हणुन मानवत तहसिल कार्यालय येथे २२ जुलै पासुन करण्यात येत आहे वेळोवेळी अहिंसेच्या मार्गाने व शांतमय वातावरणात मुकमोर्चे आयोजीत करुन सुध्दा शासनाने मराठा समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत झाला असुन आम्ही मुकमोर्चा ऐवजी ठोक मोर्चाची भुमीका घेतली आहे .शासनाने वेळीच दखल घेऊन सर्व मागण्याची पुर्तता करावी अन्यथा आंदोलनाची तिव्रता वाढविण्यात येईल व होणाऱ्या हानी बद्दल सर्वस्वी शासन जवाबदार राहिल असे म्हटले आहे.या धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष राजेशदादा विटेकर व युवा नेत्या मेघनाताई बोर्डिकर यावेळी उपस्थीत होते.या निवेदनावर जि.प.सदस्य विष्णु नामदेवराव मांडे ,पंकज आंबेगावकर,ज्ञानोबा शिंदे,माणीकराव काळे,गंगाधरराव कदम,अंबादास तुपसमुद्रे ,दिपक बारहाते ,सचीन पठाडे ,सिध्देश्वर लाडाने ,गजानन बारहाते,सागर कडतन ,ॲड.किरन बारहाते,बाबासाहेब भदर्गे ,अकबर पठाण,अशोक कचरे  यांच्यासह शेकडो मराठा बांधवाच्या स्वाक्षरी आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें