तहसीलच्या हाकेच्या अंतरावर मुरुमाची चोरी.शासनाच्या लाखोंच्या म्हसुलला चुना.
शे.सलिम.भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील जोमाळा शिवारातील गायरान येथील मुरामाची मुरूम माफियांनी जेसीबीद्वारे दर रोज चोरी करत आहे. या उतखन्नात हजारो ब्रास मुरूमाची चोरी होत असल्याने तेथील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे,या अवैध उतखनन दिवसोंदिवस वाढत चालले आहे.अवैध मुरूम चोरीला उत आला आहे. परंतु महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे या माफियांचा जोर वाढत चाल आहे.त्यामुळे आता ठोस कारवाईची गरज आहे, दिवसाढवळ्या मुरुमाची चोरी सुरु आहे. तहसीलदार योगिता कोल्हे यांना मुरुमाची चोरी संबंधी फोनवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पण फोन उचला नाही,जोमाळा येथील काही नागरिकांचं म्हणन आहे की या माफियांना तहसील मधीलच काही कर्मचाऱ्यांचा पाठबळ आहे. विशेष म्हणजे तहसीलच्या काही हाकेच्या अंतरावरच हि मुरुमाची चोरी होत असताना महसूल विभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे.मुरुमाचे अवैध उतखनन थांबून अवैध वाहतूक तत्काळ बंद करावे व स्थळाची पाहणी करून मुरूम माफियांन विरुद्ध शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी ,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें