गोळेगाव-अजिंठा रोडवर खंडाळा फाट्या नजिक राहत्या घरात १ लाख ५ हजार रुपयाची धाडसी चोरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 17 जून 2018

गोळेगाव-अजिंठा रोडवर खंडाळा फाट्या नजिक राहत्या घरात १ लाख ५ हजार रुपयाची धाडसी चोरी.

गोळेगाव-अजिंठा रोडवर खंडाळा फाट्या नजिक राहत्या घरात १ लाख ५ हजार रुपयाची धाडसी चोरी.

अजिंठा: प्रतिनिधी- मुनीर पठाण  /-
गोळेगाव अजिंठा रस्त्यावर असलेल्या खंडाळा फाट्या नजिक रहात असलेल्या उत्तम पुंडलिक गव्हाणे यांच्या रहात्या घरात दि. १५ शुक्रवार रोजी रात्री ११:३० ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने १ लाख ५ हजार रुपयाची धाडसी चोरी करुन चोरटे पसार झाले आहे.
   नेहमी प्रमाणे उत्तम गव्हाणे त्यांची पत्नी सविता गव्हाणे व त्यांच्या भावाच्या मुली जेवन करुन घरातील काम अटोपुन ११:३० च्या सुमारास घराच्या खिडक्या व दरवाजे कुलुप लावुन बाहेर अंगणात झोपलेले असताना चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी-कोंडा तोडुन घरात प्रवेश करुन उत्तम गव्हाने यांनी मुलांच्या शाळेची फिस भरण्यासाठी बॅंकेतुन पैसे काढुन घरात ठेवलेले होते व २०,००० रु.किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत,२०,००० रु किमतीची एक तोळ्याची सोन्याची एकदाणी,२०,००० रु.किमतीच्या सोन्याच्या पुतळ्या व घरात ठेवलेले रोख ४५,००० असा एकुन १ लाख ५ हजार रुपयाचा मुद्देमाल घरात घुसुन चोरुन नेला.संविता गव्हाणे या सकाळी ६ वाजेच्या सुमारास उठुन घराची कुलुप उघडुन घरात गेल्या असता त्यांना घरातील सामान अस्थाव्यस्थ पडलेले दिसले व कपाटचा दरवाजा उघडा असल्याचे दिसुन आले तेव्हा त्यांनी पती उत्तम गव्हाणे यांना उठवले व घरात घडलेला प्रकार दाखवला असता त्यांनी घराची पहाणी केली असता त्यांना मागील दरवाजाची कडी तोडल्याचे दिसुन आले व नंतर त्यांनी घरात ठेवलेले पैसे दिसले नाहि व पलंग खाली डब्यात ठेवलेले दागिने सुध्दा त्यात नसल्याचे लक्षात येताच त्यांनी सदर घटनेची माहिती अजिंठा पोलिस ठाण्यात कळविली असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले सदरील घटनेचा त्यांनी पंचनामा करुन उत्तम गव्हाणे यांच्या फिर्यादिवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास स.पो.नि.किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सांडु जाधव हे करीत आहे.

--------------------------------------
दोन महिण्यांपासुन चोरीचे सत्र सुरुच .....

                दरम्यान गोळेगाव येथे सोन्याचे दुकान असलेल्या सोनाराला गोळेगाव येथुन सिल्लोड कडे घरी जात असताना गोळेगाव नजिकच अडवुन चक्क कट्ट्यातुन गोळी झाडत १२ तोळे सोने,१ किलो चांदीसह ८० हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे ४ लाख ७२ हजाराची फिल्मी स्टाईल चोरी झाली होती.
----------------------------------------
महिना उलटला नाहि तर दुसरी चोरी

   दि.१८ मे रोजी रात्रीच्या सुमारास औरंगाबाद-जळगाव महामार्गावर गोळेगाव बस स्थानकाजवळच असलेले विजय स्पेअर पार्टचे दुकान फोडुन दुकानातील दुचाकी चे ३० टायर,बॅटरी व कॅस्ट्राॅलचे ५० लि. आॅईल असा एकुण ४८ हजार रुपयाची चोरी वर्दळीच्या ठिकाणाहुन झाली होती या चोरीलाहि एक महिना सुध्धा उलटला नसताना आता परत एकदा धाडसी चोरी करुन पोलिसांसमोर एक अवाहन ठरत आहे .

----------------------------------------
जिकडे तिकडे चोरांचीच चर्चा ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

सोशल मिडियावर लहान मुलांना चोरुन नेउन त्यांच्या किडण्या काढुन मारुन टाकत असलेली चोरट्यांची टोळी गावा-गावात दाखल झाल्याची माहिती तसेच ते महिलेची वेशभुषेत फिरतात असे व्हिडिओ सोशल मिडियाद्वारे पसरत आहे त्यात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढतच आहे आणि हि अफवा आहे कि सत्य आहे यामुळे परिसरात भितिचे वातावरण पसरले आहे.
यासंदर्भात पोलिस अधिक्षक औरंगबाद ग्रामीण तर्फे कळविण्यात आले की सोशल मिडियावर जी चोरांची माहिती पसरत आहे या अफवांवर विश्वास ठेवु नये.तसे काहि अढळुन आल्यास त्या व्यक्तीची माहिती पोलिसांना कळविण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
छायाचित्रात:अज्ञात चोरट्याने १ लाख ५ हजार रुपयाची धाडसी चोरी करुन चोरटे पसार झाले आहे.
   नेहमी प्रमाणे उत्तम गव्हाणे त्यांची पत्नी सविता गव्हाणे व त्यांच्या भावाच्या मुली जेवन करुन घरातील काम अटोपुन ११:३० च्या सुमारास घराच्या खिडक्या व दरवाजे कुलुप लावुन बाहेर अंगणात झोपलेले असताना चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी-कोंडा छाया: मुनीर पठाण अजिंठा

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें