पालम शहरात रमजान ईद उत्साहात साजरी, मुस्लिम बांधवांवर शुभेच्छांचा वर्षाव. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 17 जून 2018

पालम शहरात रमजान ईद उत्साहात साजरी, मुस्लिम बांधवांवर शुभेच्छांचा वर्षाव.

पालम शहरात रमजान ईद उत्साहात साजरी, मुस्लिम बांधवांवर शुभेच्छांचा वर्षाव.

पालम (अनीस खुरेशी )
पालम शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने रमजान ईद साजरी केली.
शनिवारी सकाळी  9:30 वाजता मर्कज मस्जीद,जुना बाजार येथुन आदर्श नगर येथील ईदगाह मैदानावर ईद उल फित्रर्ची पारंपरिक पद्धतीने नमाज पठन करण्यात आली.या आधी शहरातील विविध भागातील मस्जीद मध्ये नमाज अदा करण्यात आली.चंद्र दर्शन झाल्या पासुन मुस्लिम बांधव ईदच्या तयारीला लागले होते.सकाळी फजरची नमाज पठन करून सर्व मुस्लिम बांधव नविन कपडे परिधान करून सामुहिक नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदानावर एकत्र आले होते.
ईदगाह मैदानावर जाण्याअगोदर शहरातील विविध भागातील मस्जीदमध्ये ही नमाज पढण्यात आली.शहरातील मर्कज मस्जीदचे ईमाम मौलाना मुदस्सीर साहब कासमी यांनी नमाज पठन केली.तर  खतीब यांनी खुदबा दिला.देशात व जगात अमन सुख  शांततेसाठी दुवा करण्यात आली.दुआ झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एक दुसर्‍यांची गळाभेट  घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
रमजान ईदमधुन सामाजिक एकतेचा संदेश.=पालम शहरातील आदर्शनगर स्थित ईदगाह मैदानावर शनिवारी विविध धर्मातील पुढाऱ्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा  दिला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें