बालानगर येथे सिमेंट रस्त्याच्या काम सुरु, अवघ्या पाच महिन्यांत पाच रस्त्याचे काम पूर्ण . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 जून 2018

बालानगर येथे सिमेंट रस्त्याच्या काम सुरु, अवघ्या पाच महिन्यांत पाच रस्त्याचे काम पूर्ण .

बालानगर येथे सिमेंट रस्त्याच्या काम सुरु, अवघ्या पाच महिन्यांत पाच रस्त्याचे काम पूर्ण .

शेख एम ए.
पैठण तालुका प्रतिनिधी.
पैठण ता. 9 (प्रतिनिधी ) बालानगर ता. पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती बँक गल्ली  च्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन येथील  सरपंच जाबीर पठाण यांच्या हस्ते  करुन लगेच काम सुरू करण्यात आले. यावेळी उपसरपंच सोपान भालेकर, ग्रामविकास अधिकारी जीजाभाऊ मिसाळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री. मान्यर, तलाठी दिलीप मानघरे, संजू गोर्डे, आरेफ शेख, मच्छिंद्र गोर्डे, काकासाहेब घोंगडे, जाकीर शेख, विठ्ठल ताकवाले, शब्बीर शेख, इस्माईल शेख, अख्तर शेख, गणेश डोले, राजू गोर्डे, नितीन दिलवाले, अमोल गोर्डे, प्रविण गाेर्डे, शिवनाथ सोनवणे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
-तीन वर्षापासून रखडलेली कामे   पाच महिन्यात पूर्ण -....
सरपंच जाबीर पठाण यांनी पाच महिन्यापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर गावातील मुख्य रस्ता बाजार गल्ली, मरकस मस्जिद, जिल्हा मध्यवर्ती बँक गल्ली , हुसैन कॉलनी, तांडा वस्ती येथे सिमेंट काँक्रिट रस्ते. दोन स्मशानभूमी, धनगर समाज स्मशानभूमी,मागासवर्गी समाज स्मशानभूमी, दोन संरक्षण भिंत,ववा जिल्हा परीक्षत स्कूल संरक्षण भिंत,  तांडा वस्ती संरक्षण भिंत हि कामे अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण केली.
उपसरपंच व सर्व  ग्राम पंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे सदर काम करणे शक्य झाले आहे. ...सरपंच जाबीर पठाण 
फोटो कॅप्शन =बालानगर ता. पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती बँक गल्ली च्या सिमेंट काँक्रिटच्या कामाचे उद्घाटन करतांना सरपंच जाबीर पठाण.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें