कायदा हातात घेणारयांची गय नाही....सपोनि अभिजीत मोरे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 जून 2018

कायदा हातात घेणारयांची गय नाही....सपोनि अभिजीत मोरे.

कायदा हातात घेणारयांची गय नाही....सपोनि अभिजीत मोरे.

ईद सणाच्या पार्श्वभुमीवर आडुळ येथे शांतता समितीची बैठक.

शेख एम ए.
पैठण तालुका प्रतिनिधी
पाचोड पोलिस ठाणे हद्दीत कोणी जर अवैधधंदे करीत
असेल तर त्यांने ते तत्काळ बंद करावे. यानंतर ठाणे हद्दी कोणी कायदा व
सुव्यवस्था बिघळविण्याचा पर्यंत केला तर त्याची गय केली जाणार नाही असा
इशारा पाचोड पोलिस ठाण्यात नव्याने रुजु झालेले सहायक पोलिस निरिक्षक
अभिजित मोरे यांनी दिला. ते मुस्लिम बांधवांचा रमजान ईद या सणाच्या
निमित्त आडुळ (ता.पैठण) येथील ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित शांतता
समितीच्या बैठकीत बोलत होते. प्रथम त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
करण्यात आला. यावेळी शेख नासेरभाई, माजी सरपंच हाजी मुक्तार मौलाना,
राजेंद्र वाघ, सरपंच भिमराव ढाकणे, शेख जाबेर, माजी सरपंच रुस्तुमराव बनकर,
राहुल बनकर, पोलिस पाटील भाऊसाहेब पिवळ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष
कल्याण पिवळ, शेख आजीम, हारुण पठाण, शेख जाहेर, लक्ष्मण वाघ, रामदास
राख, कल्याण राठोड, शिवाजी जाधव, तात्यासाहेब गोपाळघरे, जीवन गुढेकर,
शेख बाबुभाई सह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें