केंद्रशासनाच्या निती आयोगाकडून मंजुरी .
सेलू (प्रतिनिधी)
केंद्र शासनाच्या नीती आयोगामार्फत चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील १६ शाळांना अटल टिंकरिंग लँबरोटरी ला मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी परभणी जिल्ह्यातील ५ शाळांचा समावेश त्या मध्ये वाल्मिकी शिक्षण संस्थेच्या शांताबाई नखाते विद्यालय देवगांवफाटा रामपुरी कासापुरी या तिन शाळांना ही लायब्ररीची मंजुरी झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये बळकटी येण्यासाठी यामुळे निश्चितच मदत होणार होणार .
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा व वैज्ञानिक संकल्पना हि त्यांना प्रत्यक्षामध्ये उतरवीता यावी या हेतूने देशभरार भारत सरकारने नीती आयोगाच्या मार्फत ३ हजार अटल टिंकरिंग लँबरोटरी ला चौथ्या टप्यात मंजुरी दिली आहे महाराष्ट्रात १९६ तर मराठवाड्यामध्ये १६ शाळांना लँबरोटरी मंजुर झाली आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यांमध्ये ५ शाळांचा समावेश आहे .विशेष बाब म्हणजे या ५ शाळा पैकी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी अंतर्गत शांताबाई नखाते विद्यालय देवगाव फाटा आणि कासापुरी व रामपुरी या तीन शाळांचा सामावेश आहे .या योजनेअंतर्गत अत्याधुनिक साधन सामग्री ,रोबोटिक टेक्नॉलॉजी, थ्री डी प्रिंटरच्या साह्याने निर्माण करण्यात येणारा डायग्राम व विविध सेन्साँरचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्स व इतर सुविधेसह या लँबरोटरी चा फायदा ६ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांना होणार आहे
अटल टिंकरिंग लँब ला मंजूरी मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष अनिल नखाते ,सचिव तथा जि.प. उपाध्यक्षा सौ . भावनाताई नखाते, संचालक अजिंक्य भैय्या नखाते ,शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ , मुख्याध्यापक प्रभाकर महाजन ,श्याम शेळके प्रल्हाद शहारे यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सर्व शाळांना लँबरोटरी मिळणारी भारतातील एकमेव संस्था म्हणजे वाल्मिकी शिक्षण संस्था....
भारत सरकारच्या नीती आयोगामार्फत परभणी जिल्ह्यात आत्तापर्यंत ७ अटल टिंकरिंग लँबरोटरी ला मंजुरी मिळाली आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात शांताबाई नखाते विद्यालय पाथरी तर दुसऱ्या टप्प्यात शांताबाई नखाते आश्रम शाळा वालूर तर तिसऱ्या टप्प्यात शांताबाई नखाते विद्यालय देवगावफाटा आणि कासापुरी व रामपुरी तसेच नवोदय विद्यालय परभणी ,पारदेश्वर विद्यालय परभणी या शाळांना भारत सरकारचे अटल लँबरोटरी मंजूर केली आहे भारतामध्ये वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी ही अशी एकमेव संस्था आहे की जिच्या पाचही शाळांना या योजनेतून लँबरोटरी मंजूर झाली आहे .
अनिल नखाते यांचे नाविन्यपूर्ण नियोजन.....
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल नखाते हे मंडळाअंतर्गत सर्व शाळेतील मुख्याध्यापक लिपीक यांची दरमहा बैठक घेऊन मागील कामाचा आढावा पुढील नियोजन या सोबतच नवीन शासकीय परिपत्रक व शासन निर्णय यावर चर्चा करतात आणि याचाच एक भाग म्हणून भारत सरकारच्या अटल टिंकरिंग लँबरोटरी साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना संस्थेचे अध्यक्ष अनिल नखाते यांनी मीटिंगमध्ये दिल्या होत्या व याबाबत पाठपुरावा केला सर्व मुख्याध्यापकांनी त्याप्रमाणे कार्यवाही केली आणि वाल्मिकी संस्थेच्या पाचही शाळांना आज अटल लँबरोटरी मंजूर झाली या मंजुरीचे श्रेय हे संस्थेचे अध्यक्ष अनिल नखाते सचिव सौ भावनाताई नखाते यांनाच जाते असे मुख्याध्यापक प्रभाकर महाजन यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें