
आळंदी नगरपालीकेचे भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. कांबळे यांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचरापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आळंदी जवळील साई मंदिराजवळ मंगळवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी कांबळे हे आळंदीकडे जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत पोलिसांनी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी वायसीएम रुग्णालयात धाव घेतली. वायसीएम रुग्णालयात मोठ्या प्रमाणातगर्दी झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले असून दिघी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अद्यापी पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नाहीत.बालाजी कांबळे यांचा भागिदारीमध्ये बांधकाम व्यावसाय आहे. त्यांचे शेजाऱ्यांबरोबर काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. याच वादातून त्यांची हत्या झाली असावीअसा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यापश्चात बहीण, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आळंदी नगरपालिकेच्या पंचवार्षीक निवडणुकीत ते पहिल्यांदाच निवडून आले होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें