वटपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण.आजी माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 28 जून 2018

वटपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण.आजी माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम.


सोनपेठ(राजेश खेडकर) दि. २८जून २०१८
सोनपेठ शहरातील सर्वात जुनी व परिसरातील चांगली शाळा असा नावलौकिक असलेल्या श्री महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी चि. विरेंद राजेश्वर खेडकर याच्या पुढाकाराने उच्च माध्यमिक विभागात शिकत असलेल्या कु.वैष्णवी प्रशांत लोंढे, कु.प्रियंका महेश  खेडकर आदींनी वटपोर्णिमेच्या पूर्वसंध्येस "वृक्ष हेच जीवनाचे आधार आहेत. वटपौर्णिमादिनी माता भगिनींनी केवळ वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून चालणार नाही, तर स्वच्छ पर्यावरण व निरामय जीवनासाठी उपलब्ध असेल त्या मोकळ्या जागेवर अधिकाधिक  झाडांचे रोपन करुन भविष्यात त्याचे स्वतःच्या मुलाबाळां प्रमाणे संगोपन  करण्याचा संदेश देत विद्यालयाच्या प्रांगणात नुकतेच नारळ व वडाच्या झाडाचे रोपन केले.
यावेळी विद्यालयाच्या रविंद्र शेटे व बसवराज टेंकाळे या कर्मचाऱ्यांनी झाडे लावण्यासाठी खड्डे करुन दिले, तसेच लावलेल्या झाडांची देखभाल व संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें