नागरीकांचे आरोग्य धोक्यात.मुख्याधिकारी याकडे लक्ष देणार का.
भोकरदन प्रतिनिधि:-शे.सलिम.नगरपालिकेने स्वछता अभियानात ४४ वा क्रमांक मिळवला हे खरे आहे पण स्वच्छता मोहिमे नंतर शहरात तशी स्वच्छता पाहायला मिळाली नाही.व पालीकेत सध्या मनमानी कारभार सुरू असल्याने सर्व सामान्य माणसाला तोंडावर बोट ठेवून बुक्याची मार सहन करावी लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे शहरात समस्याचा विळखा सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, शहरात जागोजागी कचरऱ्याचे ढीग, नाल्याचे ढापे गायब वॉर्डात साफसफाई नाही वार्डात अंधार अशा बर्याच गोष्टी कडे पालिकेच्या वतीने मुद्दाम कानाडोळा केला जात असल्याचा आरोप शहरातील नागरिकांनी रोष व्यक्त करीत आहे. शहरात पसरलेल्या दुर्गंधी मुळे अनेकांना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील पसरलेल्या दुर्गंधीचे नागरिक शिकार बनले असुन असे असले तरी संबधीत प्रशासनाला या विषय काहीच देने घेणे नसल्या मुळे व पालीकेतिल अधिकारी,पदाधिकारी तसेच कर्मचारी गायब राहत असल्याचा नवल वाटत आहे विषेश म्हणजे शहरातील नागरिकांना आपल्या कामा साठी पालिकेत चपला घासावे लागत आहे या कडे मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे हे कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरीकांनी संताप व्यक्त केला . शहरातील काही प्रभागात मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्या मुळे नेहमी किरकोळ अपघात होऊन अनेक जनांना दुखापत झाल्याचा आरोप परीसरातील नागरीकांनी केला त्याच बरोबर चौहीबाजुस नाल्यांचा घान पानी रस्तयावर येत अस्लयाने घानीचे साम्राज्य पसरले नाल्याचे ढापे फुटले सर्व घाण पाणीचे डबके साचले ज्या मुळे विविध जातीचे डासांचा प्रादुर्भाव वाढला पालिकेच्या वतीने स्वच्छ मोहीम तसेच धुरफवारणी करण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे तसेच नगराध्यक्ष यांनी निवडणुकीच्या काळात केलेले आश्वासन फोल ठरत असुन आमचा वापर फक्त निवडून येण्या करीता करण्यात आला असा आरोप नागरिकांनी व्यक्त केला. पण मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्याकडून नागरिकांना फार अपेक्षा होत्या पण तसा काही दिसत नाही .लाखो रुपये खर्च करून शहरात फायबरच्या कचरा कुंड्या बसवण्यात आल्या होत्या,मात्र आज त्या ठिकाणच्या कचरा कुंड्या गायब झालेल्या आहे.शहरातील गायब झालेल्या कचरा कुंड्या पुन्हा बसवून , गटारीची साफसफाई व शहरातील साचलेल्या कचेऱ्याची विल्हेवाट लावण्याची नागरिकांची मागणी आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें