सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.२३ ) -
सरकारने शहरी भागातील केवळ दिसणाऱ्या झगमगाटात मग्न राहून ग्रामीण भागातील जनतेकडे कानाडोळा करता कामा नये खरा मुळातला भारत ग्रामीण भागात असून काही मूठभर लोकांचे हित जपणाऱ्या भाजपा सरकारने वाडी - वस्ती - तांड्यांवर फिरुन पहावं , तरच शेतकरी - शेतमजुर - सामान्य नागरिकांची खरी परिस्थिती कळेल, बळीराजा दिवसेंदिवस कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीतच आहे.आत्महत्येचे सत्र काही थांबायला तयार नाही. सरकार मात्र सातबारा कोरा करु अशी फसवी विविध प्रकारची आश्वासने देऊन बळीराजाचा विश्वासघातच करीत असुन कर्जमाफीसह लाल्या - पिकविमा - बोंडअळीच्या नुकसान भरपाई पोटी अल्पशी मदत देत सरकारविरोधात नाराजगी व्यक्त करीत सरकार नुसत्याच भुलथापा मारीत असल्याचे मत व्यक्त करीत माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी गावा - गावातील शेतकरी - शेतमजुर - नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या बुथ समन्वयक नोंदणी व युवक काँग्रेसच्या क्रियाशिल सदस्य नोंदणी मोहिमेसंदर्भात गावा गावातील काँग्रेस पक्ष कार्यकर्ते नागरिकांसह नवतरूणांशी चर्चा करीत बुथ समन्वयक नोंदणी व युवक काँग्रेसच्या क्रियाशील नोंदणीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी गावा गावातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते - नागरिकांना केले.
सिल्लोड तालुक्यातील आसडी , रहिमाबाद , दहिगाव, सारोळा, डोंगरगाव, अन्वी, लिहाखेडी, मांडणा, मोहोळ, हट्टी आदि गावातील नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी शेतकरी - शेतमजुर - नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, माजी सभापती पुंडलिकराव लोखंडे, संचालक सतिष ताठे, नरसिंगराव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, माजी उप सरपंच अब्दुल रहीम, संजय मुरकुटे, पंचायत समितीचे माजी सदस्य निजामखा पठाण, मधुकरराव गवळी, संतोष गायकवाड, दिलीप गवळी, विठ्ठल टेकाळे, मच्छिंद्र दांडगे, माजी सरपंच श्रीरंग वाघ, रामचंद्र गोरे, विश्वनाथ काकडे, रमेश काकडे ,नामदेव खंडागळे, सुनील साखळे, मारोती गोरे, रघुनाथ कल्याणकर, नानापाटील लोखंडे आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें