देऊळगाव येथे केस व त्वचा विकार मोफत तपासणी शिबीर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 जून 2018

देऊळगाव येथे केस व त्वचा विकार मोफत तपासणी शिबीर.

देऊळगाव येथे केस व त्वचा विकार मोफत तपासणी शिबीर.

समशेर खान.
सेलू :- सेलू येथील ओम स्कीन हेअर अॅन्ड लेझर क्लिनीकच्या वतीने गुरूवारी देऊळगाव गात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत त्वचारोग निदान व उपचार शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले

शिबिराचे उद्घाटन सेलू येथील आरोग्य अधिकारी डाॅ. रावजी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. कपिल निकाळजे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे डाॅ. विलास मोरे, उपसरपंच विष्णू कदम, उद्धव हिवरे, अशोक राऊत, आरोग्य सहाय्यक श्रीमती साधना भावतिलक, औषध निर्माता अविनाश कांबळे, परिचारिका आरती चव्हाण, फार्मासिस्ट दिपक घोगरे, परिचारिका उषा थोरात यांची उपस्थिती होती. शिबिरात तारूण्यपिटीका, चेहरा काळवंडणे, काळे डाग पडणे, गजकर्ण, नायटा, इसब, सोरायसीस, श्‍वेतकोड, ऍलर्जीक रॅश, केस गळणे, टक्कल पडणे इत्यादीसह 100 च्यावर रूग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार या शिबीरात करण्यात आले. प्रत्यक्ष तपासणी व उपचार ओम स्कीन हेअर अॅन्ड लेझर क्लिनीकचे संचालक डॉ. आशिष मेहता यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें