वृक्ष लागवडीसाठी देऊळगाव, वालूर येथे श्रमदानातून खोदले खड्डे.
🔹तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सोनवणे यांचा पुढाकार.
सेलू :- तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सोनवणे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील देऊळगाव गात व वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी ता. 2 जून रोजी श्रमदानातून स्वच्छता अभियान व वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रावजी सोनवणे, डाॅ. नागनाथ निलंगेकर, डाॅ. कपिल निकाळजे, गोपाळ कदम यांच्यासह देऊळगाव गात व वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, गतप्रवर्तक व सर्व आशाताई यांची उपस्थिती होती. राज्य शासनाच्या तेरा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्य़ात वृक्ष लागवड मोहीम राबविली जाणार आहे. या अनुषंगाने परभणी जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून नुकतेच जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेऊन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या होत्या. तसेच या मोहिमेत जिल्ह्यातील आरोग्य विभागानेही सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सेलू तालुक्यात देऊळगाव व वालूर या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच 26 उप केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सोनवणे यांच्या पुढाकाराने श्रमदानातून स्वच्छता अभियान व वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात 130 तर उप केंद्रात 20 वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग घेऊन स्वच्छता अभियान व वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें