चार योजनेपैकी दोन घरकुल योजनेंची अंमलबजावणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 5 जून 2018

चार योजनेपैकी दोन घरकुल योजनेंची अंमलबजावणी.

चार योजनेपैकी दोन घरकुल योजनेंची अंमलबजावणी.

सेलू प्रतिनिधि
शहरी भागात घर
नसलेल्या नागरीकांना स्वतःचे
घर मिळावे यासाठी केंद्र शासन
व महाराष्ट्र शासनाच्या वतीने
प्रधानमंत्री घरकुल आवास
योजना राबविली जात आहे.
मुख्यत्वेकरुन चार घटकात ही
योजना राबवली जाणार होती.
मात्र सध्या दोन योजनेचीच
अंमलबजावणी होत असल्याने
पात्र लाभार्थी घरकुलापासुन
वंचित राहत आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना
चार घटकात राबविल्याचे जाहीर
करण्यात आले आहेमात्र सेलू
शहरात नगराध्यक्ष आणि
मुख्याधिकारी यांच्या मनावर ही
योजना राबवली जात असल्याने
नागरीक घरकुलापासुन वंचित
राहत आहेत. केंद्र व राज्य
शासनाच्या वतीने राबविण्यात
येणारी ही योजना चार विभागात
राबवणार असल्याचे साई नाट्य
मंदिरात झालेल्या कार्यक्रमात
जाहीर करण्यात आले होते. या
योजनेचे काम अकोला येथील
नवनिर्माण बहुद्देशीय महिला
संस्था यांना मिळाले आहे
त्यामध्ये घटक क्र. २ कर्ज
संलग्न व्याज अनुदान तर घटक
क्र. ४ लाभार्थीला स्वतःचे घर
बांधायचे तसेच दुरुस्त करायचे
असल्यास अनुदान या दोन
घटका विषयी योजना
राबविण्यात येत आहे. तर घटक
क्र. १ व ३ यातील योजना
राबविन्यात येत नसल्याचे दिसत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें