शेतकऱ्यांनी शेतीतील नव तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वळावे – आ.विजय भांबळे.
जिंतूर (अजमत पठाण):- शेतकऱ्यांनी शेतीतील नव तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वळावे व त्यातून भरघोस उत्पन्न वाढवावे असे प्रतिपादन आ.विजय भांबळे यांनी आत्मा अंतर्गत आयोजित खरीपपूर्व शेतकरी प्रशिक्षनात मौलाना अब्दुल कलाम सभागृह न.प.जिंतूर येथे केले. पुढे बोलताना आ.विजय भांबळे यांनी शेतकऱ्यांना सांगतिले कि पारंपारिक शेती व्यवसाय न करता शेतीक्षेत्रातील नवीन संधी ओळखून त्यात रेशीम शेती, शेळी पालन, मच्छी पालन, कुकुट पालन इ. धंद्याची जोड द्यावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी विविध संशोधित वाणांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंदास भेटी द्याव्यात व माहिती घ्यावी. कृषी विभागाच्या कर्मचार्यांनीहि प्रत्येक गावात जाऊन बोंडआळी, कीटक नाशक, फवारताना घ्यावयाची काळजी या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम घ्यावेत असे सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र वनाकृवीचे व्यवस्थापक श्री यु.एन.आळसे यांनी खरीप हंगामातील कापूस, तूर, सोयाबीन या पिकांविषयी मार्गदर्शन केले. तर रेशीम संशोधन केंद्र वनाकृवीचे प्रमुख श्री सी.बी.लटपटे यांनी रेशीम उद्योग, तुती लागवड, ते कोष विक्री तंत्राविषयी मार्गदर्शन केले. केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक श्री प्रशांत भोसले यांनी कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतीपूरक उद्योग याविषयी मार्गदर्शन तर आत्म्याचे प्रकल्प संचालक के.आर.सराफ यांनी शेतकरी गट आत्माच्या उद्देश व कार्य कंपनीचे स्थापण्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी वर्नेश्वरी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष दिलीप अंभूरे, तंत्रज्ञान व्यवस्थापक एस.एन.अंभूरे तालुका कृषी अधिकारी एस.जे.वाकळे, श्री खनपटे, राऊत, भराडे, सूर्यवंशी यांच्यासह गटांचे प्रमुख, शेतकरी मित्र मोठ्या प्रमाणत उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें