दुसऱ्यांना दुचाकी देताना सावधान! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 जून 2018

दुसऱ्यांना दुचाकी देताना सावधान!

दुसऱ्यांना दुचाकी देताना सावधान!

वि.प्रतिनिधी.
आपले मित्र किंवा ओळखीच्या व्यक्ती आपल्या कामासाठी दुचाकीची मागणी करतात. माणुसकीच्या दृष्टिकोनातून तुम्ही दुचाकी देता. पण जर अपघात घडला आणि त्यामध्ये वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा ती व्यक्ती जखमी झाली तर मोटारसायकल मालकच दोषी ठरू शकतो. कारण दुचाकी चालविणाऱयाचा परवाना नसेल तर मोटारसायकल देणाराच गुन्हेगार ठरतो. याबाबतचा महत्त्वपूर्ण निकाल तिसरे उच्च दिवाणी न्यायालयाने दिला असून मोटारसायकल चालविणाऱया व्यक्तीचा परवाना नसल्याने मोटारसायकल मालकाला दोषी ठरवून त्याला कारागृहाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून कोणत्याही व्यक्तीला दुचाकी देताना आता प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे.
हणमंत रामाप्पा तुंगळ (रा. बुदनूर, ता. रामदुर्ग) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची मोटारसायकल क्रमांक केए 24 के 7492 लक्ष्मण परसाप्पा जंबगी (वय 24) याने नेली होती. मात्र, लक्ष्मणचा मोटारसायकल चालविण्याचा परवाना नव्हता. याची माहिती हणमंत यांना नव्हती. लक्ष्मण मोटारसायकल घेऊन जाताना त्याचा अपघातात मृत्यू झाला. दि. 5 एप्रिल 2013 रोजी बुदनूर (ता. रामदुर्ग) जवळील एका पुलावरून पडून ही दुर्घटना घडली. मोटारसायकलची सर्व कागदपत्रे होती. याच बरोबर विमाही होता. पण चालविणाऱया लक्ष्मणचा मात्र वाहन परवाना नव्हता.
या प्रकरणी मयत लक्ष्मणचे वडील परसाप्पा (रा. वंटमुरी, बेळगाव) यांनी मोटारसायकल दिलेल्या हणमंत तुंगळ यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. अपघात घडल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मोटारसायकल मालक लक्ष्मण यांच्यावर मोटारसायकल कायदा 163 (अ) अन्वये गुन्हा नोंद केला होता. हा खटला तिसरे उच्च दिवाणी न्यायालयामध्ये सुरू होता. या ठिकाणी अनेक साक्षी तसेच कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मोटारसायकल चालविणाऱया लक्ष्मणचा वाहन परवानाही नव्हता. त्यामुळे मोटारसायकल देणाऱया व्यक्तीला न्यायालयाने दोषी ठरविले होते. मयत लक्ष्मणच्या कुटुंबीयांना मोटारसायकल मालक हणमंत यांनी 5 लाख 50 हजार रुपये देण्याचा आदेश दिला होता. मात्र, ती रक्कम त्यांनी दिली नाही. त्यामुळे न्यायालयाने हणमंत यांना अटक करून कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मोटारसायकल दिली. पण त्यांना कारागृहाची हवा खावी लागली आहे. या खटल्यामध्ये फिर्यादीच्यावतीने ऍड. एन. आर. लातूर यांनी काम पाहिले.
वाहन परवाना असणाऱयांना मोटारसायकल द्या
आपल्या लहान मुलाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला मोटारसायकल देणे हे अत्यंत धोकादायक आहे. अलीकडेच 163 (अ) हा कायदा लागू झाला आहे. यामध्ये मोटारसायकल मालकच दोषी ठरू शकतो. तेव्हा भले समोरची व्यक्ती दुखावली गेली तरी चालेल. पण मोटारसायकल देताना विचार करणे गरजेचे आहे. मोटारसायकल चालविणाऱया व्यक्तीचा परवाना आहे की नाही याची चाचपणी करावी. त्यानंतरच मोटारसायकल द्या. अन्यथा, माणुसकी जपण्याच्या भावनेतून तुम्हीही अडचणीत येऊ शकता. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करा. अन्यथा, कारागृहाची हवा खावी लागणार यात शंका नाही.
वाहन परवाना-विमा असेल तरच कंपनी जबाबदार
दुचाकी चालविणाऱया व्यक्तीचा वाहन चालविण्याचा परवाना तसेच त्या दुचाकीचा विमा असेल तरच विमा कंपनी नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी स्वीकारते. अन्यथा, दुचाकी मालकच त्या अपघाताला जाबाबदार असतो. तेव्हा दुचाकी चालविणाऱयांनी स्वत:चा परवाना काढून घेणे गरजेचे आहे. याच बरोबर दुचाकीचा विमादेखील भरणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, अपघात झाल्यानंतर कोणालाच नुकसानभरपाई मिळणार नाही. तेव्हा वेळीच काळजी घ्या. अन्यथा, बेजबाबदारपणे वागणाऱया कोणालाही अशा प्रकारे दणका बसू शकतो.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें