राशन दुकानदाराची मनमानी ;राशन पासुन अनेक जण वंचित - सराटी येथील ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा ;
सिल्लोड (प्रतिनिधी).सराटी येथील राशन दुकानदार खुपच मनमानी कारभार करीत असुन राशनची जास्त दराने विक्री करीत अनेकांना धान्यापासून वंचितच ठेवित असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे करण्यात आली असून सदरील दुकानदाराच्या मनमानी कारभाराला आळा बसविण्यात यावा नसता उपोषणास बसू असा इशाराही देण्यात आला आहे.
सराटी येथील राशन दुकानदार सुंदर गंजीधर गुळवे हे गावातील अनेक कुटूंबांना स्वस्त धान्यापासून वंचितच ठेवित आहे. गावातील अनेक कुटूंबांना धान्यापासून वंचित ठेवल्याबरोबरच जास्त दराने धान्य तसेच राॅकेलही विक्री करीत आहे. राॅकेल अनेक महिन्यांपासून वाटपच करण्यात आले नाही. तुम्ही कोणत्याही अधिका-यांकडे जाऊन माझी तक्रार करा माझे कुणी काहीही करित नाही अशी धमकी देऊन आमच्या येथील अनेक कुटूंबांना स्वस्त धान्यापासून वंचितच ठेवित आहे. सदरील स्वस्त धान्य दुकानाची सखोल चौकशी करुन दुकान निलंबित करुन बोदवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला किंवा महिला बचत गटाला राशन दुकान वर्ग करण्यात यावे तसेच सदरील राशन दुकानदाराविरोधात सखोल चौकशी करावी नसता आम्ही ग्रामस्थ तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशाराही सराटी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसिल कार्यालयाकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें