13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांनी समाजहित जपावे= पालकमंत्री बबनराव लोणीकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 जून 2018

13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांनी समाजहित जपावे= पालकमंत्री बबनराव लोणीकर.

13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांनी समाजहित जपावे= पालकमंत्री बबनराव लोणीकर.


वि.प्रतिनिधी.समशेर खान.
मंठा.
जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेऊन राज्यात 13 कोटी आणि जालना जिल्ह्यात 36 लाख वृक्ष लागवड करून सर्वांनी आज समाजहित जपण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री ना बबनराव लोणीकर यांनी आज मंठा येथे केले. मंठा येथे आज वृक्ष दिंडी कार्यक्रम कार्यशाळा, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, पीक विमा व पीक कर्ज वाटप आढावा बैठकी दरम्यान ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवानेते राहुल भैय्या लोणीकर, अप्पर जिल्हाधिकारी खपले, जेष्ठ नेते भुजंगराव गोरे, अंकुश आबा कदम, डॉ संजय रोडगे, गणेश दादा रोकडे, शिवाजीराव खंदारे, तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे, ज्ञानेश्वर शेजुळ, सभापती संदीप गोरे, रामेश्वर तनपुरे, परतूर उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, जालना उपविभागीय अधिकारी नेटके, जिल्हा उपनिबंधक आघाव, अग्रणी बँकेचे इलमकर, जिल्हा कृषी अधिकारी तांबळे, वन विभागाचे जगतकर, सामाजिक वनीकरण विभागाचे शिंदे, उपसभापती राजेश मोरे, माजी सभापती संभाजी खंदारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संपूर्ण देशभर वृक्ष लागवड करणे गरजेचे असून त्याशिवाय निसर्गाचा समतोल राखता येणार नाही, महाराष्ट्रात यापूर्वी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गचक्र बदलत चालले असून निसर्ग अनियमित बनला आहे. आज निसर्ग पूर्णपणे अनियमित झाला आहे त्याचे मुख्य कारण वृक्ष लागवड न करणे, त्याच प्रमाणे त्याची जोपासना न करणे हे असून वृक्ष लागवड करण्यापासून ते त्याची जोपासना करण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची असल्याचे मत यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाने जालना जिल्ह्यात 36 लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून ते साध्य करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी लोणिकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रत्येक शासकीय कार्यालय, निम शासकीय कार्यालय, सेवाभावी संस्था, ग्रामपंचायतींनी आपापली जबाबदारी ओळखून वृक्ष लागवडी सोबतच त्याची जोपासना करण्याची गरज असल्याचे यावेळी लोणीकर म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचे ऑडिट होणार असून वृक्ष लागवड कार्यक्रमापूरती न करता प्रत्यक्ष जोपासना करावी अशी सूचना यावेळी पालकमंत्री लोनिकर यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकरी बांधवाना कर्जमाफी देण्यात आली असून त्याबाबत एकही पात्र शेतकरी लाभ मिळण्यापासून वंचित राहणार नाही याची प्रशासनासह सर्वांनी काळजी घ्यावी अशी सूचना देखील यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी केली.

जालना जिल्ह्याला मागील काळात आघाडी शासनाच्या तुलनेत खूप मोठया प्रमाणात पीक विमा मिळालं असून यावर्षी शासनाकडून जालना जिल्हयाला 186 कोटी रुपये पीक विमा मिळाला असल्याचे यावेळी लोणीकर म्हणाले. पिकाचा दर्जा उत्तम राहावा व शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी लोणीकर म्हणाले.

नव्याने पीक कर्ज मिळावे यासाठी सर्व बँकांनी पुढाकार घ्यावा व शेतकरी परेशान होणार नाही याची काळजी बँकांनी घ्यावी असे देखील यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले. नवीन पीक कर्ज किंवा पुनर्गठन बाबत बँकांनी शेतकरी हिताची भूमिका घ्यावी व शेतकरी बांधवाना त्रास होणार नाही असे नियोजन बँकांनी करावे अशा सूचना देखील यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी दिल्या.

नुकत्याच झालेल्या इस्राईल दौऱ्याबाबत बोलताना लोणीकर पुढे म्हणाले की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इस्राईल सारख्या अत्यंत छोट्या देशाने पाण्याचे उत्तम नियोजन केले असून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन केले आहे त्याच प्रमाणे आपल्या देशात सुद्धा नियोजण होणे गरजेचे असून त्याच धर्तीवर आपण मराठवाडा वॉटर ग्रीड राबवणार असल्याचे यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले.

वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 1 जुलै पासून वृक्ष दिंडी काढली जाणार असून त्यात सर्वांनी सहभागी होऊन समाजाचे उत्तरदायित्व स्वीकारावे असे आवाहन देखील यावेळी लोणीकर यांनी यावेळी केले. यावर्षी सर्व ग्रामपंचायतीसह सर्व कार्यालये , शाळा याना वृक्ष लागवड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सर्वांनी त्या वृक्षाची जोपासना व्हावी यासाठी जबाबदारीने काम करावे असे देखील यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंठा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये 10 वी, 12 वी सह mpsc परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, प्रसंगी वन विभाग, सामाजिक वनीकरण, कर्जमाफी, पीक कर्ज, पीक विमा याबाबत अधिकारी वर्गाने माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मंठा तालुका दक्षता समिती अध्यक्ष अशोक वायाळ यांनी केले.

यावेळी मदनलाल शिंगी, रामप्रसाद थोरात, नागेश घारे, नाथराव काकडे, शिवदास हानवते, विष्णू फुपाटे, सुभाष राठोड, निवास देशमुख, माऊली गोंडगे, सतीश निर्वळ, मुस्तफा पठाण, माऊली वायाळ, पंजाब पुणेकर, गणेश चव्हाळ, नितीन सरकटे, नारायण बागल, आबासाहेब सरकटे, भीमराव राठोड यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, त्यांचे सदस्य यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें