मराठा समाजाचे सर्जेराव रजाळे यांनी धरले रमजान महिन्यातील सर्व उपवास.
भोकरदन (प्रतिनिधी ) तालुक्यातील सोयगाव देवी येथील रहिवासी सर्जेराव यशवंता रजाळे यांनी सध्या सुरू असलेल्या रमजान महिन्यातील जवळपास सर्वच उपवास केले आहे.मागील पंचवीस वर्षा पासुन ते रमजान महिन्यातील सर्व उपवास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्जेराव रजाळे हे शेतकरी असून त्यांचा दुध विक्री चा व्यवसाय आहे. दररोज सकाळी ते मोटारसायकल वर भोकरदन ला दुध घेऊन येतात.
विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्यात रमजान असताना ही त्यांनी उपवास असताना ही सकाळी सहेरी केल्यानंतर म्हशी चे दुध काढून सकाळी च भोकरदन ला येतात.
दरम्यान, सर्जेराव रजाळे यांनी तीस वर्षे होमगार्ड म्हणून ही सेवा केली आहे.
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात हिंदू धर्मातील लोक ही उपवास करीत आहेत. त्यामुळे रमजान महत्व अधोरेखित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें