सेलु येथील फरहानाझ बेग यांचे घवघवीत यश.
सेलू (प्रतिनीधी)
शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालय येथील फरहानाझ अबरार बेग हिने दहावीच्या शालांत परीक्षेत 80% गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादीत केले. या नेत्रदिपक कामगिरीने तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून सर्वजण तिचे कौतूक करीत आहेत.
फरहानाझ बेग हिने शिक्षणात यश प्राप्त करण्यासाठी अत्यंत जिद्रद, चिकाटीने व विद्यालयातील शिक्षकांचे मोलाचे वेळोवेळी मार्गदर्शन घेउन गुणवत्तेत प्रथम येण्यासाठी प्रयत्न केले. विद्यालयातील मुख्याध्यापक दत्तात्रय नागरे, नरेश पाटील, काशिनाथ ढोले, प्रदिप कौसडीकर, जयश्री सोन्नेकर मॅडम, किशोर खारकर, सूरेश मारेवाड आदि शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्रदल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव तिच्यावर होत आहे.
तसेच महेश कुलकर्णी, अकबर बेग, शेख इमाम, नगरसेवक रहीमखान, अफसर बेग, अझहर बेग, अफशेख आरेफ, वडील पत्रकार अबरार बेग, आई आरेफा बेगम यांनी अभिनंदन व सत्कार करून पुढिल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें