दिवाणी न्यायालय सोनपेठ येथे वृक्षारोपण. वृक्षारोपण व संवर्धन सामजिक चळवळ सोनपेठ व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास यांचा संयुक्त उपक्रम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 9 जून 2018

दिवाणी न्यायालय सोनपेठ येथे वृक्षारोपण. वृक्षारोपण व संवर्धन सामजिक चळवळ सोनपेठ व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास यांचा संयुक्त उपक्रम.

दिवाणी न्यायालय सोनपेठ येथे वृक्षारोपण.

वृक्षारोपण व संवर्धन सामजिक चळवळ सोनपेठ व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास यांचा संयुक्त उपक्रम.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०९जून २०१८
सोनपेठ तालुक्यातील वनक्षेत्राची संख्या सातत्याने घटत असल्याने ही कमतरता भरून काढण्यासाठी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील कै.बाजीराव देशमुख विद्यालयातील उपक्रमशिल सहशिक्षक महेश जाधव यांनी वृक्षारोपण व संवर्धन सामजिक चळवळ नावाच्या उपक्रमातून शाळेतील मुलांना सोबत घेऊन विविध प्रकारच्या झाडांची बीजगोळे तयार करून शाळेतच रोपवाटिका तयार केली आहे. वृक्ष लागवडीसाठी सोनपेठ व पाथरी तालुक्यातील तरुण आता एकत्र येऊन वृक्षारोपणाच्या या कार्यात वेळ देत आहेत. या उपक्रमातच दिवाणी न्यायालय सोनपेठ परिसरात मा.न्या.अभय विभूते यांच्या नुकतेत हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी वकिल संघाध्यक्ष अॅड.डी.आर.मोकशे, सरकारी वकील अॅड.बी.एम.लोमटे, अॅड.एस.एस. भिसे, अॅड.एम.एन.चिमनगुंडे, अॅड.जी.आर.तोंडगे, अॅड.आर.पी.भिसे, अॅड.के.डी.मोकशे, अॅड.व्ही.आर.धबडे, समाजसेवक डॉ.दीपक काळे, नै. पर्या.संवर्धन व मानवता विकासचे जिहाध्यक्ष महेश जाधव (वृक्षमित्र), जिल्हा सचिव माऊली आदत, पाथरी तालुकाध्यक्ष दत्तात्रय मोरे, सोनपेठ तालुकाउपाध्यक्ष सुशील सोनवणे, ए.बी.कांबळे, शिवाजी कदम, सचिन सिरसाट, आनंद तिरमले आदीनीं यावेळी वृक्षारोपन केले.
प्रा.पंडित राठोड, प्रा.सतीश तिरमले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचे व सर्व मान्यवरांचे आभार महेश जाधव यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें