आडुळ येथे पाचोड पोलिसातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन.
शेख एम ए .पैठण तालुका प्रतिनिधी.
सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरु
असल्याने आडुळ ता. पैठण येथे पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळल्यानंतर प्रथमच
पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षण अभिजीत मोरे, पोलिस
उपनिरिक्षक गोरक्ष खरड यांच्या प्रमुख उपस्थित शनिवार (ता.९) रोजी येथील
मदरसा अल बनात आयेशा सिद्दीका (रजी) येथील मस्जिद मध्ये पाचोड
पोलिसाच्या वतीने ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेख
नासेरभाई, माजी सरपंच हाजी मुक्तार मौलाना, राजेंद्र वाघ, सरपंच भिमराव
ढाकणे, शेख जाबेर, माजी सरपंच रुस्तुमराव बनकर, राहुल बनकर, पोलिस
पाटील भाऊसाहेब पिवळ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कल्याण पिवळ, शेख
आजीम, हारुण पठाण, शेख जाहेर, लक्ष्मण वाघ, मदरशाचे मुख्याध्यापक
शमशुद्दीन कारी, रामदास राख, कल्याण राठोड, शिवाजी जाधव, तात्यासाहेब
गोपाळघरे, जीवन गुढेकर सह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें