सावळी येथे गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.
जिंतूर प्रतिनीधी :(पठाण अजमत)
तालुक्यातील सावळी येथील रहिवाशी असलेल्या 24 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना 2 जून रोजी दुपारी 3 : 30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठी लिहून सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील सावळी येथील रहिवासी विठ्ठल सुधाकर घुगे वय 24 हे आपल्या वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत मात्र मागील वर्षी झालेल्या दुष्काळामूळे जेमतेम उत्पन्न झाले होते परंतु ते उत्पन्न कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पण पुरले नसल्याने ते नेहमी नैराश्यात राहत असत त्यातच 1 जून रोजी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पेरणीसाठी लागणारे बि बियाणे कसे खरेदी करावे याच विवंचनेत होते घटनेच्या दिवशी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घरून न्याहारी करून शेतात कामाला चाललो असे सांगून गेले होते परंतु दुपारचे जेवण करण्यास घरी न आल्याने घरच्या नातेवाईकांनी शेतात पाहिले असता शेतातील उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले दरम्यान घटनास्थळी जिंतूर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली चिट्ठी खिशात सापडली असून सततची नापिकी व पेरणीसाठी पैसे नसल्याचे नमूद करण्यात आले होते मयत शेतकऱ्याचा पश्चात आई व दोन लहान भाऊ असा परिवार आहे गावातील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हाळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान वृत्त लिहिपर्यन्त घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें