मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद निवडणूक लढवणार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 जून 2018

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद निवडणूक लढवणार.

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद निवडणूक लढवणार.

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड व आंतर राष्ट्रीय दहशतवादी हाफीज सईद हा पाकिस्तानची सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे. सईदने स्थापन केलेला मिल्ली मुस्लीम लीग या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी न केल्यामुळे सईद व त्याचे इतर उमेदवार ‘अल्ला-हू-अकबर-तेहरिक’ या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे. पाकिस्तानात येत्या २५ जुलैला सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत.गेल्या वर्षी हाफिज सईदने पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणूका लढविण्यासाठी ‘मिल्ली मुस्लीम लीग’ या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. मात्र अमेरिकेने मिल्ली मुस्लीम लीग’ या राजकीय पक्षाला दहशतवादी संघटना जाहीर केले होते. अमेरिकेच्या या निर्णयानंतर हाफिजच्या राजकारणातील प्रवेश धूसर झाला होता. मात्र आता हाफिजने ‘अल्ला-हू-अकबर-तेहरिक’ या निवडणूक आयोगाकडे नोंद असलेल्या मात्र राजकारणात सक्रीय नसलेल्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. हाफिज सईदच्या पाकिस्तानातील वास्तव्यामुळे अमेरिकेने देखील पाकिस्तानवर टीका केली होती. त्यामुळे चीनने सईदला पश्चिम आशियाई देशात हलविण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर हाफिज सईदला पाकिस्तानातून दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र आता हाफिज सईदने पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने पाकिस्तानची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें