गेवराई मर्दा (ता. पैठण) शिवारातून शुक्रवार ( ता. १ ) रोजी एका शेतकऱ्याचे गोठ्यात बांधलेले सहा जनावरे चोरट्यांनी मध्यरात्री च्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 जून 2018

गेवराई मर्दा (ता. पैठण) शिवारातून शुक्रवार ( ता. १ ) रोजी एका शेतकऱ्याचे गोठ्यात बांधलेले सहा जनावरे चोरट्यांनी मध्यरात्री च्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली.

गेवराई मर्दा (ता. पैठण)  शिवारातून शुक्रवार ( ता. १ ) रोजी एका शेतकऱ्याचे गोठ्यात बांधलेले सहा जनावरे चोरट्यांनी मध्यरात्री च्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली.


मुनाफ पटेल
पैठण तालुका प्रतिनिधी
गेवराई मर्दा (ता. पैठण)  शिवारातून शुक्रवार ( ता. १ ) रोजी एका शेतकऱ्याचे गोठ्यात बांधलेले सहा जनावरे चोरट्यांनी मध्यरात्री च्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      पारुंडी तांडा (ता. पैठण) येथील शेतकरी उत्तम रामजी राठोड यांची गेवराई मर्दा शिवारात गट क्रमांक ४० मध्ये दीड एकर शेती असून या शेतात त्यांनी जनावरे बांधण्यासाठी गोठा तयार केला होता. ते शुक्रवारी सायंकाळी शेतीतील शेती काम आटोपून या गोठ्यात आपली एकूण सहा जनावरे बांधून घरी गेले होते. हि संधी साधून चोरांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेले दोन बैल, दोन गायी, एक गोऱ्हा, एक कालवड असे एकूण ऐंशी हजार रुपये किमतीचे सहा जनावरे खुट्यावरून सोडून लंपास केले. शनिवार ( ता. २ रोजी ) पहाटे जेंव्हा उत्तम राठोड हे शेतात जनावरांना चारा वैरण करण्यासाठी गेले तेंव्हा त्यांना गोठ्यात बांधलेली जनावरे चोरीस गेल्याचे नजरेस पडले. त्यांनी तत्काळ पाचोड पोलीस ठाणे गाठून जनावरे चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली. यानंतर बिट जमादार गोरखनाथ कणसे, शेख नुसरत यांनी घटनास्थळी धाव घेऊन थापटी तांडा ते बालानगर रोडने  तपास सुरू केला तेंव्हा त्यांना चोरीला गेलेल्या सहा पैकी दोन गायी, एक गोऱ्हा अशी त्यातील तीन जनावरे मिळूनआली. गोठ्यातून चोरांनी बाजूलाच असलेल्या चाऱ्याच्या काही पेंढ्या हि चोरून नेल्या.मिळून आलेल्या दोन गायी पैकी एका गायीच्या पायाला मार लागल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी करतांना चोरांनी लहान वाहनाचा वापर केला असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक  अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गोरखनाथ कणसे हे करित आहे.
चौकट
मागील आठवड्यात आडुळ ता पैठण येथील शेतकरी एकनाथ भावले यांची त्यांच्या शेतातून दोन बैल चोरीस गेले होते. त्याचा आणखीन पत्ता लागला नाही तोच हि घटना घडल्याने परिसरातील शेतकर्‍यांत घबराटीचे वातावरण आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें