इखरा मित्र मंडळाचे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथदान.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.१८जून २०१८सोनपेठ शहरातील बहुचर्चीक सामाजीक कार्यात सदोदित आग्रेसर असलेल्या इखरा मित्रमंडळाचे अध्यक्ष सद्दाम भैय्या हुसेन यांचा वाढदिवस मंडळाच्या सदस्यांच्यावतीने सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस ग्रंथ भेट देवून साजरा करण्यात आला. यावेळी सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांनी ग्रंथभेट स्विकारली. कार्यक्रमास सद्दाम हुसेन यांच्यासह इखरा मित्र मंडळाचे सदस्य शेख जावेद, शोएब काज़ी, समीर कुरेशी, नेहाल बागवान, शाकेर कुरेशी, राजू बागवान, एम.डी.मोबिन, आरेफ कुरेशी, आसिफ शेख, समीर शेख आणि इतर मित्र परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें