शेतकरी दुष्काळ निधीचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा.
वि.प्रतिनिधी.समशेर खान.नांदेड, (प्रतिनिधी)-शेतकरी दुष्काळ निधीचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, अशा प्रकारची याचिका तहसीलदार सुरेखा नांदे यांनी न्यायालयात दाखल केल्यानंतर ही याचिका न्यायालयाने रद्दबातल केली आहे. त्यामुळे सुरेखा नांदे यांच्यावर आता कारवाई अटळ आहे.
नायगाव येथील तहसीलदार सुरेखा नांदे या यापूर्वी वसमत तहसील कार्यालयात कार्यरत होत्या. या कालावधीत त्यांनी शेतकरी दुष्काळ निधीतील २ लाख ८३ हजार रुपये परस्पररित्या खासगी खात्यावर जमा करुन एटीएमव्दारे उचलले. या प्रकरणी वसमत येथील तत्कालीन तहसीलदार सुरेखा नांदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासंबंधी न्यायालयात माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकेर शेख सगीर यांनी मागणी केली होती. या मागणीवरुन दि.१ जानेवारी २०१८ रोजी वसमत येथील तत्कालीन तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याविरुध्द न्यायालयाच्या आदेशावरुन कलम ४२०,४६४,४६८, ४७१, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा रद्द करावा अशी याचिका सुरेखा नांदे यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात केल्यानंतर या याचिकेवर सुनावणी होवून ही याचिका न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे तहसीलदार सुरेखा नांदे यांच्यावर कारवाई अटळ असून त्यांना अटक करुन घ्यावीच लागणार असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकरणातील फिर्यादी शेख जाकेर यांच्यातर्फे ऍड. आशिष शिंदे, ऍड. आय.आय. कादरी यांनी काम पाहिले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें