सेलू तहसिल परिसरातील ‘त्या’ ट्रॅक्टरचे गुड उलगडेना.
उपजिल्हाधिकारी पारधी यांनी दोन दिवसात चार ट्रॅक्टर पकडले.
सेलू : वाळु तस्कर व महसुल विभागाच्या संबंधीत अधिकारी यांच्यात ट्रॅक्टर धरपकडीचा खेळ चांगलाच रंगात आला आहे. तहसिल परिसरात अशा पकडण्यात आलेल्या एका कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर परिसरातुन ६ जूनच्या मध्यरात्रीपासून ट्रॅक्टर आढळुन आला नाही.
परंतू या ट्रॅक्टरमध्ये असलेल्या वाळुचा ढिग मात्र घटनास्थळी पहावयास मिळाला असे ट्रॅक्टर परिसरातुन गायब झाले असते तर त्याची हरवल्याची तक्रार देण्यात आली असती. पण अशा प्रकारची तक्रारच पोलिस ठाण्यात नाही. मग हे कुबोटा कंपनीचे ट्रॅक्टर नेमके वाळु घटनास्थळी टाकुन गेले कसे याचे वाढलेले गुढ मात्र उलगडेना. शिवाय तहसिलच्या दोन विभागाचे प्रमुख प्रदिप मुनेश्वर यांच्याकडे चौकशीसाठी वारंवार संपर्क केला असता त्यांनी फोन घेण्याचे साधे सौजन्यही दाखविले नाही. बहुदा ते याच ट्रॅक्टरच्या शोधात असावे म्हणुन फोन घेऊ शकले नसतील. विशेष म्हणजे तहसिलचा गौणप्रमुख म्हणुन त्यांची जिमेदारी असल्याने या प्रकारातील सर्व नोंदी त्यांच्याकडे आहेत. मात्र या कुबोटाची नोंद नसल्याचे गुढ तहसिल परिसरात चर्चीले जात होते. हे तहसिल परिसरातुन बेपत्ता झालेले कुबोटा कंपनीचे ट्रॅक्टर परिसरात कधी लावण्यात आले, ते कोणाच्या मालकीचे आहे आणि कोणी पकडले या सर्वच प्रश्नाचे उत्तरही बेपत्ता झालेल्या ट्रॅक्टर कुबोटा सारखेच गुढ आहे.
उपजिल्हाधिकारी पारधी यांनी पकडले चार ट्रॅक्टर
उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी सेलू उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यापासुन आपल्या धडक कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवार ७ जून रोजी दोन वाळुचे ट्रॅक्टर पकडले तर यापूर्वी ६ जून रोजी दोन वाळुचे ट्रॅक्टर पकडण्यात आले. दोन दिवसात चार वाळâचे ट्रॅक्टर पकडण्यात आले. त्यांचा ट्रॉली क्रमांक या प्रमाणे आहे. एम.एच. १८ - ९७० (महिंद्रा कंपनी), एम.एच. २० - ए.बी. ९०६२, एम.एच. २२ - ए.एम. १६१४, एम.एच. २८ - १७६७ अशा वाळु वाहतुक करणार्या चार ट्रॅक्टरवर उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी पकडून संबंधीतांकडे कारवाईसाठी देण्यात आले आहे.
सेलूत कुबोटाचे गुढ ठरले
आठवे आश्चर्य=सेलू तहसिल परिसरात वाळुची तस्करी करणार्या एका कुबोट कंपनीच्या ट्रॅक्टरच्या गायब होण्याने वाढलेल्या गुढाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता या कुबोटाचे गुढ म्हणजे आठवे आश्चर्य असेच म्हणावे लागेल. जगात भलेही सात आश्चर्य असतील पण सेलूत कुबोटाचे आठवे आश्चर्य म्हणजे हे कुबोट ट्रॅक्टर एकाच कंपनीचे, एकाच रंगाचे आणि एकावरही नंबर नसलेले आहे. योगायोगाने एकाच वेळी सर्व ट्रॅक्टर जवळ आले तर हे कुबोटाचे गुढ आणि त्याचे आश्चर्य म्हणजेच आठवे आश्चर्य लक्षात येईल. पण आर्थिक साट्यालोट्यामुळे असे यातील आश्चर्य उघड होत नाही.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें