संघाच्या व्यासपीठावरून प्रणव मुखर्जींनी दिले देशभक्ती आणि लोकशाहीचे धडे.
नागपूरमधील संघस्थानी प्रमुख पाहुणे म्हणूनआलेल्या प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावरून देशभक्ती आणि लोकशाहीचे धडे दिले. भारतातील विविधता, हजारो वर्षांपासूनची समृद्ध संस्कृती, लोकशाहीचा वारसा, यांचा उल्लेख करत विविधतेच एकता हेच भारताचे सौंदर्य असल्याचे प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. तसेच विविधता असली तरी भारतीय हीच आपली ओखळ असली पाहिजे असे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समाऱंभासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. कॉंग्रेसच्या विचारधारेतून घडलेले प्रणव मुखर्जी यावेळी स्वयंसेवकांना नेमके काय उद्बोधन करणार, याकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. प्रणव मुखर्जी यांनीही आपल्या संबोधनामधून देशाच्या समृद्ध इतिहासाला उजाळा देतानाच विविधतेत एकतेची ताकद अधोरेखित करून सध्याच्या काळात येत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर टीकास्र सोडले. लोकशाहीत राष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वजनिक चर्चा झाली पाहिजे . चर्चेतून जाटिल समस्यादूर होऊ शकतात . महिलेवर अत्याचार होतो तेव्हा देशाच्या आत्मा जखमी होतो . हिंसाचार वाढतो आहे, देशात शाब्दिक व शारीरिक हिंसा व्हायला नको . संताप, हिंसा यापासून दूर जायला हवे . लोकशाहीत जनता ही केंद्रस्थानी असली पाहिजे. जनतेमधील एकता तोडण्यासाठी काहीही होता काम नये . सरकारचे लक्ष्य गरिबी दूर करणे , व आर्थिक विकासातून विकास साधणे हे असले पाहिजे . देशात एकात्मता वाढीस लागावी व आनंदी वातावरण वाढावे हे धोरण तयार करताना लक्षात घ्यायला हवे, असे प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें