पोलीसांची कर्तव्यदक्षता व माणूसकीचा प्रामाणिक पणा कौतुकास्पद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 जून 2018

पोलीसांची कर्तव्यदक्षता व माणूसकीचा प्रामाणिक पणा कौतुकास्पद.

पोलीसांची कर्तव्यदक्षता व माणूसकीचा प्रामाणिक पणा कौतुकास्पद.

वि.प्रतिनिधी.समशेर खान.
    सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीणचे पोलीस हवालदार ब.नं.113 कैलास राऊत हे त्याचे मुलाचे शैक्षणिक कामाकरीता जून 2018 चे पहिल्या आठवड्यात लातूर येथे गेले होते त्यानंतर ते  लातूर वरून सोलापूर येथे  एस. टी. बसने प्रवास करीत परत येत असताना सोलापूर  येथे बस स्थानकावर उतरत होते तेव्हा एस टी मधील बॅग ठेवले ठिकाणी वरून बॅग घेत असताना कॅरेज मध्ये शालेय कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली दिसली ती कागदपत्रे गोळा करून घेवून सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला दुसरे दिवशी आलेनंतर  आधार कार्ड,  जन्म दाखला, 10, 12 वीचे मार्कलिस्ट, बोनाफाईड, हाॅल तिकीट व अशी इतर महत्त्वाचे कागदपत्रे असल्याने संबंधित मुलाचा मोबाईल नंबर मिळविणे करिता संबंधित तेलंगणा राज्यातील  संगारेड्डी जिल्हा झहीराबाद तालुक्यातील अल्लीपूर मंडल गावाचे संबंधित पोलीस स्टेशनचा नंबर मिळवून फोन करून जगदनकर ओंकार अनिलकुमार या मुलाविषयी चौकशी केली असता त्याचा संपर्क नंबर मिळाला नाही. पो.हे.काॅ./ कैलास राऊत याचे सहकारी पो.ना./ स्वामीराव जाधव व पो.ना./गोपाळ साखरे यांनी सगळी कागदपत्रे रजिस्टर  पोस्टाने पाठविणे बाबत चर्चा करून पाकीट आणून ती कागदपत्रे रजिस्टर पोस्टाने नमूद पत्त्यावर पदर खर्चाने आज दिनांक 18/06/2018 रोजी पाठवून सामाजिक बांधिलकी जोपासत पोलीसांचा कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पणा दाखविला आहे. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें