युवक काँग्रेसच्या सदस्य नोंदणी मोहीमेसंबंधी बैठक संपन्न ;
निवडणूक जिंकण्याची युवा शक्ती मुख्य अस्ञ - आ.अब्दुल सत्तार;
सिल्लोड (प्रतिनिधी) दि 19काँग्रेस पक्षाच्या बुथ समन्वयक नोंदणी व युवक काँग्रेसच्या क्रियाशिल सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ काँग्रेस पक्ष कार्यालय गांधीभवन मध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांचा उपस्तिथीत करण्यात आला. यावेळी आ.अब्दुल सत्तार म्हणाले पक्षातील युवाशक्तीच्या बळावर निवडणूका सहज जिंकता येतात त्याकरिता युवक काँग्रेस मजबूत असणे काळाची गरज आहे.
सिल्लोड येथे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे निवडणूक व पक्षसंघटन मजबूती तयारीचा आढावा घेण्यासाठी माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखालील (दि 19)आढावा बैठक घेण्यात आली.
पुढे बोलतांना आ.अब्दुल सत्तार म्हणाले काँग्रेस पक्ष अठरा पगड जातीला घेऊन चालणारा पक्ष असुन शेतकरी - शेतमजुर सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे - सातत्याने उभा राहिलेला आहे. आजघडीला भाजप सरकारने या सर्व घटकांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. समाजातील व्यापारी - शेतकरी - शेतमजुर कामगार युवक - विद्यार्थी यातील एकही घटक समाधानी नसून त्यांना असुरक्षितता वाटत आहे. राज्याचे व देशाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी लोकांच्या हाताला काम - शेतक-यांच्या मालाला दाम महिला व व्यापा-यांना सुरक्षितता प्रदान करुन देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे संघटन बुथ लेवलपासुन मजबूत करण्यासाठी बुथ समन्वयक व युवक काँग्रेस क्रियाशिल सदस्य नोंदणीची देशभर सुरुवात करण्यात आली आहे. या पक्ष संघटना मजबूतीच्या अभियानात पक्ष कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे असे आवाहन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,श्रीराम पाटील महाजन,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर,नगराध्यक्ष अब्दुल समीर,तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,अशोक सुर्यवंशी, नंदकिशोर सहारे,रमेश साळवे,शकुंतलाबाई बन्सोड,लक्ष्मण पाटील तायडे,आदींनी मार्गदर्शन केले. तर पक्ष संघटना व युवक काँग्रेसची बांधणी करण्यासंदर्भात माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ,रुपेश जैस्वाल,लक्ष्मण कल्याणकर,अक्षय मगर,सुभाष जाधव , एकनाथ शिंदे,बाबासाहेब पारखे,संजय आरके सुनील लांडगे,राजू दुधे,विजय खाजेकर,गजानन महाजन,दशरथ सुरडकर,प्रा.खोमणे,रईस मुजावर पठाण,आदींनी पक्षसंघटन मजबूतीविषयी मत व्यक्त केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश ताठे,अमीत आरके,राजू साठे,सुखदेव जिवलग,कौतिकराव मोरे,रफिक देशमुख,विश्वासराव दाभाडे, शेख सलीम,संजय मुरकुटे,राजू सुरडकर,हनिफ मुल्तानी,रामभाऊ झोंड,मनोज जैस्वाल,संदीप राऊत,डाँ. फेरोज खान,राजरत्न निकम,सुनील दुधे,महम्मद ईसाक,संदीप राऊत,शेख बाबर,राजुमिया देशमुख,अनिसखा पठाण,जमीर मुल्तानी,रमेशसिंह ठाकूर,समाधान साळवे,संभाजी हावळे,काशिनाथ पांडव,सुनील साखळे,रघुनाथ कल्याणकर,कृष्णा लोखंडे आदिंसह पदाधिकारी - नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मन्सूर कादरी यांनी केले तर आभार विक्रांत दौड यांनी व्यक्त केले.
चौकट : जिल्हाअध्यक्ष पदाची निवडणूक लढणार -
नगराध्यक्ष अब्दुल समीर ;
जालना लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी युवक काँग्रेस जिल्हाअध्यक्ष पदाची निवडणूक लढणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. काँग्रेस पक्षाच्या बुथ समन्वयक नोंदणी व युवक काँग्रेसच्या क्रियाशिल सदस्य नोंदणीच्या सुरू असलेल्या कार्यक्रमांत वाडी - वस्ती - तांड्यासह मतदारसंघातील युवक - कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सदस्य नोंदणी करावी असे आवाहन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांना केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें