सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.२४ ) -
रयतेचा राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्यांवरही शेततळी उभारली.त्या काळातही
शेतक-यांसाठी जलयुक्त योजना राबवल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. आजही किल्यांवरील डोहांमध्ये जुन्यांचे नवे पाणी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे काळात शेतक-यांनी कधी आत्महत्या केल्या का ? असा प्रश्न उपस्थित करीत आजच्या काळातील सरकारने जलयुक्त कामे निकृष्ठ दर्जाचे करुन कोट्यावधी रुपयांचा मलिदाच लाटण्याचे काम केले जात आहे. पावसाचे पाणीही या जलसंधारणच्या झालेल्या कामांमध्ये थांबत नसेल तर दुबार पिक घेणारा शेतकरी कसा तयार होईल? असा प्रश्न उपस्थित करीत भाजपा सरकारवर टीका केली.
काँग्रेस पक्षाच्या बुथ समन्वयक नोंदणी व युवक काँग्रेसच्या क्रियाशिल सदस्य नोंदणी मोहिमेसंदर्भात गावा गावातील काँग्रेस पक्ष कार्यकर्ते नागरिकांसह नवतरूणांशी चर्चा करीत बुथ समन्वयक नोंदणी व युवक काँग्रेसच्या क्रियाशील नोंदणीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी गावा गावातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते - नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेत असतांना केले.
सिल्लोड तालुक्यातील मोढा खु.मोढा बु. वांगी, धानोरा, भराडी, वांजोळा, वडोदचाथा, बोजगाव आदी गावातील शेतकरी - शेतमजुर -नागरिकांच्या माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी भेटी गाठी घेऊन पिकविमा - बोंडअळी मदतनिधीसंदर्भात चर्चा करीत सरकारविरोधात नाराजगी व्यक्त करीत पावसाळी अधिवेशनात मदतनिधीसंदर्भात प्रश्न उपस्थित करीत अधिवेशन चालूच देणार नाही असे मत व्यक्त केले. यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे, दामुआण्णा गव्हाणे, गजानन महाजन, माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, संजय मुरकुटे, विठ्ठलराव साळवे, किसनराव पंडित, पुर्णेराव साळवे, साहेबराव साळवे, आप्पाराव पंडित, समाधान साळवे, लक्ष्मण कल्याणकर, राम सरोदे, पांडुरंग साळवे, नशीर पठाण, भाऊसाहेब पाखरे, गुलाबनबी पठाण, रसूल पटेल, देविदास सुरडकर आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें