सेलू. प्रतिनिधी.समशेर खान.दि.24/06/18.
सेलू पासून पाथरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुंडी पाटीपासून एक किलोमीटरच्या अंतरावर ट्रक आणि ऑटो यांची समोरासमोर धडक होऊन ऑटोतील प्रवाशांपैकी एक ठार सात जखमी झाल्याची घटना रविवार 24 जून रोजी सकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी घडली ऑटोतील प्रवासी हे सिमुरगव्हाण परिसरातील स्वामी नरेंद्र महाराज यांच्या नाणीज उपपीठ येथील धार्मिक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी जात असताना अपघात झाल्यामुळे नरेंद्र महाराजांच्या भाविका वर काळाचा घाला झाला असेच म्हणावे लागेल याबाबत अधिक माहिती अशी की सेलू शहरातील रेल्वेस्थानकापासून बाहेरून विविध ठिकाणाहून आलेले स्वामी नरेंद्र महाराजांचे शिष्य सिमुरगव्हाण परिसरातील नानीज उपपीठा कडे ऑटो द्वारे जात होते रविवारी सकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी पाथरी कडून भरधाव वेगाने येणारी व वीटने भरलेली ट्रक (एम एच 20 ऐ टी 1599 ) व सेलू हुन सिमुरगव्हाण कडे जाणारा ऑटो (एम एच 20 टी 3808) यांची समोरासमोर जोराची धडक झाली कुंडी पाटीपासून एक किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातामुळे सेलू पाथरी रस्ता पूर्णपणे बंद झाला होता रस्त्यावर ट्रक व त्यामधील विटा अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या ट्रकच्या व रस्त्याच्या बाजूला स्वतःचे अस्तित्व गमावून बसलेला ऑटो पलटी झालेल्या अवस्थेत होता घटनास्थळावर अपघाताची दृश्य भयावह होते ऑटो च्या सभोवताली रक्ताचा सडा पडलेला होता घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की पाथरी कडून येणारा ट्रक व सेलू करून येणारा ऑटो यांची समोरासमोर धडक झाल्या नंतर मोठा आवाज झाला व घटनास्थळावर गंभीर जखमी अवस्थेतील प्रवासी मला वाचवा असे मोठ्याने ओरडत होते त्यावेळी तेथे काही क्षणात उपस्थित झालेले माऊली गजमल हरिभाऊ रवळगाव कर सुरेश मोगल भगवान बालटकर पंढरीनाथ मोगल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जमादार एच आर पालवे आनंदा थोरवट बाळू कदम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख मुजीब अजिस भाई हनुमान श्रीरंगराव नाईक आदींनी अपघातातील जखमींना आटोपून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठवले घटनास्थळावरील विशेष बाब म्हणजे गंभीर अवस्थेतील जखमी ऑटोचालक याने इतर जखमी प्रवाशांना ऑटोतून बाहेर काढण्यासाठी मदत केली
सदरील अपघातामुळे सेलू पाथरी रस्ता तब्बल दोन तास बंद झाला होता परिसरातील नागरिक व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील ट्रक व विटा बाजूला करून सेलू पाथरी रस्ता मोकळा केला व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली घटनास्थळावरून तीन रुग्णवाहिकेद्वारे घटनेतील जखमींना सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यामध्ये प्रद्युम्न आश्रोबा इंगळे वय 34 वर्षे राहणार इंगळे बोरगाव ,ता.पाथरी ,दत्ता गंगाधर कोसेवार वय पंचवीस वर्ष राहणार बिलोली नांदेड ,साईनाथ वीरप्पा बोडके वय पंचवीस वर्ष राहणार पोखर्णी नांदेड, मधुकर मारुती सुरवसे वय चाळीस वर्ष राहणार शिरूर आनंतपाळ, सिद्धेश्वर रंगराव गव्हाडे वय 30 वर्षे राहणार गुंजरगाव ,शंकर मानेस बरेवाड वय तीस वर्ष राहणार कुंडलवाडी नांदेड ,सुनील गंगाधर योगेकर वय 25 राहणार कुंडलवाडी नांदेड ,आदी जखमींना सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ जनार्दन गोळेगावकर व डॉ विठ्ठल तिडके तसेच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी संध्या गवळी शारदा डफळ अनिता डफळ सतीश कांबळे राजवंती बहोत सविता चव्हाण श्रीकांत कलालढे प्रल्हाद जाधव आदींनी अपघातातील जखमीं वर वैद्यकीय उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ विठ्ठल तिडके यांनी दिली आहे तसेच सदरील अपघातात वैजनाथ धोंडीबा बरेवाड वय 26 राहणार शिरूर आनंतपाळ या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ तिडके यांनी दिली तसेच शंकर मानेश बरेवाड याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे सुनील गंगाधर योगेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर मधुकर मारुती सुरवसे हेदेखील गंभीर जखमी असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे सदरील अपघातात एक ठार तीन गंभीर तर चार किरकोळ जखमी झाले आहेत.
ट्रक मधील कर्कश आवाज आणि जखमींचा टाहो
घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्त ट्रक मधून चालकासह पाच ते सहा इसम पळून गेले त्यावेळी ट्रक मधून कर्कश्य आवाजात गाणे सुरू होते तर अपघात ग्रस्त ऑटो मधील गंभीर जखमी अवस्थेतील प्रवासी आम्हाला वाचवा असे मोठ्याने ओरडत होते एकीकडे मनाला वेदना देणारा अपघात ग्रस्तांच्या टाहो तर दुसरीकडे मनात संताप निर्माण करणारा ट्रक मधील गाण्यांचा आवाज घटनास्थळावर ऐकायला मिळाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते
अपघातानंतरही नशीब आडवे आले=अपघातातील गंभीर रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना सेलू पाथरी रस्त्यावरील रेल्वे गेट बंद झाले होते औरंगाबाद कडून परभणी परभणी कडे जाणारी मालगाडी सातोण्या वरून सुटल्यामुळे रेल्वे गेट बंद झाले होते याचा त्यामुळे रुग्णवाहिकेला दहा ते पंधरा मिनिट रेल्वे गेटवर थांबावे लागले त्याच रुग्णवाहिकेतील गंभीर अवस्थेतील रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर मयत घोषित करण्यात आले त्यामुळे सगळे प्रयत्न संपल्यानंतर नशिबा कडे जाणारा माणूस नशिबात अपघात होतात इतके म्हणत असतानाच नंतर रेल्वे गेट बंद असल्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी देखील नशिबाने साथ दिली नाही म्हणून अपघातातील गंभीर तरुणाचा मृत्यू झाला.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें