जि.प.शाळा,रायपूर ता.सेलू येथे पार पडला निरोप आणि स्वागत समारंभ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 24 जून 2018

जि.प.शाळा,रायपूर ता.सेलू येथे पार पडला निरोप आणि स्वागत समारंभ.



    दि.२० जून रोजी यावर्षी झालेल्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत जि.प.शाळा,रायपूर येथील प्रभारी मु. अ. श्री.के.पी.सोळंके,श्री.सावरगावकर व श्री.विठ्ठल भिसे यांची बदली होऊन ते अनुक्रमे प्रा.शा.राव्हा, ढेंगळी पिंपळगाव व कन्हेरवाडी येथे गेले आहेत.त्यांनी रायपूर येथे केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रा.शा.रायपूरच्या वतीने त्यांचा शाल,पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी गावातील अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.तसेच अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी बोलताना भावना अनावर झाल्या.
      यावेळी रायपूर येथील नव्याने रुजू झालेले पदवीधर शिक्षक तथा प्रभारी मु.अ.श्री.रोंगे सर,श्री.प्रकाश काळे सर,श्री.दीपक कांडेकर सर तसेच श्रीमती देशपांडे मॅडम यांचे सुद्धा गावकऱ्यांनी यथोचित स्वागत व सत्कार केला.
 यावेळी मु.अ.श्री.रोंगे सर यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कसोटीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.या दोन्ही कार्यक्रमासाठी गावातील शा.व्य.समितीचे अध्यक्ष,सदस्य,प्रतिष्ठित नागरिक,विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गजानन शितळे यांनी तर आभार श्री.माधव गव्हाणे यांनी व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें