चुकीचा सोनोग्राफी रिपोर्ट देणाऱ्या डॉ मालपाणी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 जून 2018

चुकीचा सोनोग्राफी रिपोर्ट देणाऱ्या डॉ मालपाणी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी.

चुकीचा सोनोग्राफी रिपोर्ट देणाऱ्या डॉ मालपाणी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी.


किडनीस्टोन नसतानाही डॉ मालपाणी यांनी  सोनोग्राफी मध्ये दाखविले दोन किडनी स्टोन.


रूग्णाला अपँडिक्स चा त्रास वाढल्याने करावे लागले आँपरेशन.


सेलू (प्रतिनिधी)
      डॉक्टरांचा हे  सोनोग्राफीच्या अहवालावरून उपचार करीत आसतात . परंतु सोनोग्राफीचा रिपोर्ट चुकीचा दिला तर त्याचे दुष्परिणाम काय होतात असा प्रकार सेलु शहरात घडला असून रुग्णाला किडनी स्टोन नसतानाही डॉक्टर मालपाणी यांनी निष्काळजीपणे तपासणी करून दोन किडनीस्टोन असल्याचा रिपोर्ट दिला परंतु सदरील रुग्णाला अपेंडिक्स चा त्रास वाढल्याने ऑपरेशन करावे लागले यामुळे चुकीचा सोनोग्राफी अहवाल देणाऱ्या डॉक्टर मालपाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मेडीकल काँन्सील च्या नियमाप्रमाणे  कार्यवाही करावी याबाबत तक्रार पोलीस निरीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे नोंदवली आहे हा प्रकार वैद्यकीय क्षेत्राला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे हा प्रकार उघडकीस आल्यामुळे सोनोग्राफी अहवालावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न रुग्णांच्या मनात येत असून रुग्णांमध्ये एक प्रकारे अस्वस्थता पसरली आहे.
                              याबाबतची अधिक माहिती अशी की पोलीस निरीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांना रेवनआप्पा साळेगावकर त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे नमूद केले आहे की माझा मुलगा अथर्व साळेगावकर याला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे २४ मे रोजी डॉ.बुरेवार यांच्याकडे तपासणी केली असता त्यांनी सोनोग्राफीसाठी डॉ.मनोज  मालपाणी यांच्याकडे पाठवले डॉ. मालपाणी यांनी सोनोग्राफी करून दोन  किडनी स्टोन असल्याचा अहवाल दिला होता .त्यामध्ये एक ११ एम एम.व दुसरा ७ एम.एम.असे किडणीस्टोन चे आकार आसल्याचे नमुद केले आहे .या  अहवाल वरून डॉ बुरेवार यांनी प्रथमोपचार करुन तज्ञ डॉक्टर चा सल्ला घ्या असे सांगितले.परंतू त्या रात्री.अथर्व चा त्रास कमी न होता वाढला त्यामुळे मुळे त्याला डॉक्टर खुरुसणे यांच्याकडे दाखवले आसता डॉ.खुरूसणे  यांनी परभणी येथे मनियार सोनोग्राफी सेंटर ला  सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे अथर्व ची २५ मे रोजी  परभणी येथे मनियार सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफी डॉ.अश्विन मंत्री यांनी दोन वेळा सोनोग्राफी केली त्यामध्ये किडनी स्टोन आढळे नाहीत पण अपेंडिक्स आढळून आले त्यांच्या अहवालावरून यमुना हॉस्पिटल परभणी डॉ के एस.माघाडे यांच्याकडे अथर्वचे २६ मे रोजी ऑपरेशन करावे लागले .अथर्व तब्येत ठिक होणे महत्वाचे आसल्यामुळे तक्रार देण्यास प्राधान्य दिले नाही .अथर्व ची प्रकृती ठीक झाल्यानंतर ११जून रोजी पुन्हा एकदा अथर्व ची वरद सोनोग्राफी सेंटर सेलू येथे डॉ डख यांच्याकडे सोनोग्राफी करून घेतली या सोनोग्राफी मध्ये सुद्धा अथर्व चा रिपोर्ट नॉर्मल आला असून त्याला किडनी स्टोन नसल्याचं अहवालामध्ये नमूद आहे.
           या सर्व बाबी वरून डॉ.मनोज मालपाणी यांनी दिलेला दोन किडणी स्टोन असल्याचा रिपोर्ट हा चुकीचा आहे हि बाब निष्पन झाली आहे   जर डॉ मालपाणी यांच्या सोनोग्राफीच्या अहवालावरून अथर्वचे किडनी स्टोनचे ऑपरेशन केले असते तर त्याला नाहक त्रास होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता त्यामुळे निष्काळजीपणे चुकीचा रिपोर्ट देणारे डॉ.मनोज मालपाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मेडिकल कौन्सिलचे नियमानुसारप्रमाणे त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी रेवनआप्पा साळेगावकर यांनी पोलीस निरीक्षक जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे.


 रूण्णांमध्ये अस्वस्थता पसरली आहे....

            आपला आजार बरा व्हावा यासाठी रूग्ण हजारो रूपये फिस व औषधीचा खर्च करतात.परंतू सोनोग्राफी चा आहवाल चुकिचा ठरत आसेल तर हा प्रकार रूग्णांच्या जिवाशी खेळणारा आहे.त्यामुळे सोनोग्राफी साठी रेफर करणारे डॉ यांनी सुध्दा या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे .चुकिच्या सोनोग्राफी ची माहीती कळताच उपचार घेतलेल्या अनेक रुग्णामध्ये अस्वस्थता पसरली आहे.



न्यायालयात खटला चलविणार......

               ज्यांच्या नशिबी हा प्रसंग येतो त्यालाच त्याचे गांभिर्य समजते .हा प्रकार माफी करण्यासारखा मुळीच नाही .माझ्या ठिकाणी दुसरा कोणी आसता तर दवाखाण्याची तोडमोड केली आसती परंतू आपण कायदेशीर मार्गाने कार्यवाही व्हावी याकरीता रितसर तक्रार नोंदवली आहे  .जर यामध्ये पोलीस निरीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडुन विहित मुदतीत योग्य कार्यवाही झाली नाही तर संबधीतासह पोलीस निरीक्षक व जिल्हाशल्यचिकित्स यांना प्रतिवादी करून आपण न्यायालयात खटला चालवणार अशी प्रतिक्रिया अथर्व चे वडील रेवणअप्पा साळेगांवकर यांनी दिली .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें