गारांनी शिवार गारेगार केलं उभ्या रानावरून वारं गेलं. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 जून 2018

गारांनी शिवार गारेगार केलं उभ्या रानावरून वारं गेलं.

गारांनी शिवार गारेगार केलं उभ्या रानावरून वारं गेलं.


सेलू : हिंगोली येथील कवी अण्णा  जगताप यांनी  आपल्या सादरीकरणाने श्रोत्यांना जिंकून घेतांनाच कवितेतून शेतकय्रांच्या मांडलेल्या वेदनेन श्रोत्यांच्या नेञकडा नकळत ओलावल्या. सेलू नागरी सहकारी पतसंस्था म सेलू आणि शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने 'मिरगाच्या कविता' हा कार्यक्रम रविवार तारीख १७ रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद् घाटन श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विठ्ठल भुसारे, प्रसिद्ध कादंबरीकार भारत काळे,कवी डॉ.केशव खटींग यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक  डी.एम.नागरे हे होते. आपल्या कवितेत अण्णा जगताप पुढे म्हणतात की,
तू, रसाळीला आलीस
आणि गोड आंब्याचा मोसम निघून गेला
कवी अमृत तेलंग यांनी शेतकरी बापाचं चिञण कवितेतून साकारलं. ते म्हणतात,
 दुसय्राचे वावर आयन्यावणी नादर करतांना
चोता चोता व्हायचा देह
तानायचा नाड्या तुटोस्तोर
त्याला भेटायचा दररोज सूर्य नव्या धुय्राला
तर मुंबईचे कवी जितेंद्र लाड यांनी आपल्या कवितेतून आई विषयीची भावना व्यक्त केली ती अशी,
माझ्या जगण्याचं बळ तुझ्या डोळ्यांची करूणा
लाख दिव्यांचा महाल आई तुझ्याविन सुना
 चंद्रपुरच्या कवयित्री गीता देव्हारे-रायपुरे यांनी, माय सोसते वादळं जीव आटापिटा करी
बीज अंकुरता पोटी मिळं जन्माची भाकरी
ही कविता सादर केली.
पेरलेलं रान सार ऊन जाळीत चाललं
नक्षञाच्या पावसानं गाव नेमकं टाळलं
सिनेगीतकार,कवी विष्णू थोरे यांच्या या शेती आणि शेतकरी यांच्या व्येथेचे चिञण साकारणाय्रा कवितेने सेलूकर श्रोते गहिवरून गेले. विष्णू थोरे आपल्या कवितेत पुढे म्हणतात,
धुळ पेरा उसवला गेले काळजाला चरे
कुणी गोजिय्रा मोराचे पाय खुटले नाचरे
 तर नागपूर हून आलेल्या कवयित्री स्वाती बंगाळे यांनी,
नितीमुल्यांच्या होळीत संस्कृतीची चिता जळते
विकृतीच्या वणव्यात माणूसकी होरपळते
       या कार्यक्रमात उपशिक्षणाधिकारी प्राथमिक पदी नियुक्ती बद्दल विठ्ठल भुसारे यांचा सेलू तालूका जिल्हा परिषद शिक्षकांच्यावतीने तर पाच जून  पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड पुणे येथे संपन्न झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात शरद ठाकर यांना 'गुगलीकार' हा बहुमान मिळाल्या बद्दल सोबतच ते आणि संभाजी रोडगे  मराठी विषयात सेट ही वरिष्ठ प्राध्यापक पदासाठीची पाञता परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव लहाने यांनी केले. भुमिका शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे सचिव सुरेश हिवाळे यांनी मांडली.सुञसंचालन किसन कटारे तर आभार प्रदर्शन एकनाथ जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशिनाथ पल्लेवाड,दिगंबर रोकडे,प्रा.राजाराम झोडगे,प्रा.सतीश मगर,कॉ.अशोक उफाडे आणि शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी =सेलू : येथील सेलू नागरी सहकारी पतसंस्था म सेलू आणि शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित मिरगाच्या कविता कार्यक्रमात कविता सादर करतांना  अण्णा जगताप मंचावर विष्णू थोरे, स्वाती बंगाळे,गीता देव्हारे,अमृत तेलंग.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें