पालम शहरात राष्ट्रीय महामार्ग क्षैणी क्र.1 या राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पालम या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 जून 2018

पालम शहरात राष्ट्रीय महामार्ग क्षैणी क्र.1 या राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पालम या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.

पालम शहरात राष्ट्रीय महामार्ग क्षैणी क्र.1 या राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पालम या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.


पालम ( अनीस खुरेशी )
पालम शहरात राष्ट्रीय महामार्ग क्षैणी क्र.1 या राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पालम या कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक 18 जुन रोजी सपंन्न झाले.
दिनांक 29 में 2018 या तारखेला शासनाकडून आदेश निघाल्यावर आज दिनांक 18 जुन रोजी नवघरे साहेब सहायक अभियंता क्षैणी क्र.1 राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालय पालम यांच्या हस्ते भित कापुन व श्रिरीफळ फोडुन मोजक्याच कार्यालयातील कर्मचार्यांच्या
 उपस्थित सोमवारी दुपारी दिड वाजता उद्घाटन संपन्न झाले.
या छोटेखानी उद्घाटन संपन्न झाल्यावर कसलाच गाजावाजा न करता व कोणत्याही राजकीय लोकांची उपस्थित नसल्याने तालुक्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
*तेज न्युजचे प्रतिनिधि अनीस खुरेशी यांनी. नवघरेसाहेब सहाय्यक अभियंता क्षैणी क्र.1 राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पालम यांच्याकडून प्रतिक्रिया जाणुन घेतली असता नवघरे यांच्या मते चार ते पाच महिन्यात राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू होणार आहे*
आमच्या प्रतिनिधींनी नेमक्या   कोणत्या राष्ट्रीय महामार्गचे काम होणार आहे व पालम तालुक्यातील कीती राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले आहेत व त्यांचे क्रमांक काय आहे या बद्दल नवघरेसाहेब सहाय्यक अभियंता क्षैणी क्र.1 राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पालम याना  प्रश्न केले असता त्यांना  उत्तर देता आले नाही.
सदरील उद्घाटन समारंभात नवघरेसाहेब सहाय्यक अभियंता क्षैणी क्र.1 राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पालम यांच्या मार्गदर्शनाखाली उघडे शाखा अभियंता क्षैणी क्र.1 राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पालम
मोहसीन अन्सारी सेवक
चालक वाघ हे चार अधिकाऱ्यांनी उद्घाटन करून मोकळे झाले.
*पालम येथील सां.बा.उपविभाग ( ग्रामीण ) गंगाखेडला*
पालम शहरातुन नवीन राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे पालम येथील संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागातील शहराला जोडणाऱ्या  रस्त्याची दुरूस्ती व देखभालीसाठी असलेले  पालम येथील सां.बा.उपविभाग ( ग्रामीण ) गंगाखेडला हलविण्यात येत आहे पालम येथील लोकप्रतिनिधी लक्ष देतील का हा एक पश्न  निर्माण होत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें