सेलू/ प्रतिनिधी. उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी अग्रगण्य असलेली ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा पारडी येथ " लेखक आपल्या भेटीला" पुष्प ७वे हा नाविन्यपूर्ण उपक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध साहित्यिक माननीय दिगंबर रोकडे ,सेलू हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय मुख्याध्यापक राम मैफळ तर प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब लघें उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक दिगंबर रोकडे यांनी प्रथम मुलांशी सुसंवाद साधला . त्यांच्या स्व लिखित कवितांच्या माध्यमातून त्यांनी मुलांशी साहित्यनिर्मिती वर चर्चा केली. वडिलांचे महत्व सोप्या शब्दात मुलांना सांगत असताना त्यांनी आई वडिलावरील स्वलिखित कविता सादर केली
ज्यांचे ठायी वसतेपृथ्वी, अग्नी ,वायू आप
माय माही देव, देव माझा बाप...
माझं तिथंच राऊळ ...चरणात जपजाप...
या कविता वर ताल धरतात आमच्या चिमुकल्या हातांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या माध्यमातून दिगंबर रोकडे सरांनी आई आणि वडिलांच महत्त्व आमच्या मुलांच्या मस्तकात उतरवलं. सोबतच अभ्यासक्रमातील असलेली शंकर कसबे यांची कविता गायन करून मुलांना एक वेगळा अनामिक आनंद दिला. अशाप्रकारे अभ्यासक्रमातील विविध कविता, व इतर साहित्य प्रकार याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं.
कार्यक्रमाच्या मध्यवर्ती शाळेतील मुलांनी दिगंबर रोकडे सरांशी प्रश्न द्वारे चर्चा केली. मुलांनी अनेक प्रश्न विचारून साहित्यातील विविध प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कविता कशा सुचतात,? की त्या जाणीवपूर्वक केल्या जातात? असाही प्रश्न विद्यार्थ्याकडून विचारला गेला. यावर दिगंबर रोकडे यांनी उत्तर देतांना मुलांना म्हंटले तिच्या माणसाच्या जवळ संवेदनशील मन असतं त्या माणसाच्या रोमारोमात कविता फुलते. कविता या केल्या जात नाहीत तर त्यात कविता अपसुक जिभेवर येतात आणि त्या हाताद्वारे लिखित स्वरुपात आपल्या सर्वांच्या समोर सादर होतात. याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी संतोष नारायणकर यांच्या कवितांच्या ओळी सादर केल्या
कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे........स्वतःच आपली राख उधळीत जाणे .....
अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी दिगंबर रोकडे सरांना आपल्या मनातील अनेक प्रश्न विचारून कविता व पाठ, व कादंबरी ,ललित साहित्य, इत्यादी साहित्यप्रकाराविषयी इत्यंभूत माहिती जाणून घेतली. विषय खेळीमेळीच्या वातावरणात दिगंबर रोकडे यांनी मुलांच्या मनात कवितांचा बिजांकुरण केलं.
यावेळी कुमारी राधा शेळके, काजल राठोड, आदी विद्यार्थ्यांनी लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाच्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना होत असणारे फायदे याविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मैफळ यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून लेखक साहित्यांची ओळख कशा प्रकारे मुलांना होते, त्याचे फायदे याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी दिगंबर रोकडे यांचा सन्मानचिन्ह , ग्रंथ , गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच विद्यार्थ्यांनी वेगवेगळी ग्रीटिंग्स तयार करून त्यांना दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज माने व आभार प्रदर्शन संजय काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक, रुपनर, विठ्ठल शेळके, मंगेश नरसिंगकर, सुभाष लंघे सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें