शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राम पाटील यांच्या नेतृत्वात होणार आंदोलन.
सेलू प्रतिनीधी
तालुक्यातील देऊळगाव ते लाडनांद्रा 10 की मी रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठा मोठा त्रास सहन कारावा लागत मात्र प्रशासनाला वेळो वेळी सूचना देऊनही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे म्हणून शिवसेना विधानसभा प्रमुख तथा गटनेते राम पाटील यांनी प्रशासनाला निवेदन देऊन येत्या सोमवार 2 जुलै रोजी पाथरी रोडवरील देवळगाव पाटीवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे..
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना शहरातील कामकाजासाठी राज्य व केंद्र सरकारच्या वतीने रस्ते बांधकाम करण्यात आले आहेत परंतू बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे यात सेलू शहरापासून देउळगाव मार्गे राधे धामणगाव,खवणे पिंप्री, डासाळा लाडनांद्रा आदी गावांना जाणारा रस्ता आहे मात्र मागील अनेक दिवसांपासून या रस्त्यावर मोठं मोठी खड्डे पडल्याने वाहन धारकास कसरत करत चालावे लागत आहे यामुळे सर्वसामान्य जनतेला मानेचा कंबरेचा त्रास जाणवत आहे तसेच खड्डे चुकविण्याचा नादात अनेक जणांचे अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत अनेक जण जखमी होऊन कायमचे अपंगत्व आले आहे त्याच बरोबर गरोदर महिलांची खराब रस्त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत यातच कित्येक महिला रस्त्यातच प्रसूत झाल्याचा घटना घडल्या आहेत परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना याचे काही सोयर सुतक राहिले नसल्याने वेळो वेळी सूचना निवेदन देऊनही कोणतीही दखल घेतली नसल्याने शिवसेना विधानसभा प्रमुख तथा गट नेते राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याच्या इशारा वरील गावातील नागरिकांनी दिला आहे प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख रणजीत गजमल,प स सदस्य रुख्मिनी कदम,सुनंदा पवार,दत्तराव झोल,चक्रधर पौळ,सुभाष गायकवाड,जिवन चव्हाण,प्रल्हाद गोरे,पवन घुंबरे, गोपाळ कदम,भुजंगराव खूरूस्ने,अनिल जावळे, बाबा भाबत,विलास गिराम,अतुल डख,अरुण ताठे, रामेश्वर विर, शुभम बुरकुले, कृष्णा तांदळे, पपू काळे,पांडुरंग खरात आदीच्या सह्या आहेत

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें