पविञ रमजान महिण्यात तीन हिंदु युवकांनी ठेवला रोजा, युवकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून,अमन ग्रुपने केला सत्कार.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 जून 2018

पविञ रमजान महिण्यात तीन हिंदु युवकांनी ठेवला रोजा, युवकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून,अमन ग्रुपने केला सत्कार..

पविञ रमजान महिण्यात तीन हिंदु युवकांनी ठेवला रोजा,

युवकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून,अमन ग्रुपने केला सत्कार..


  प्रतिनिधी : जालना

  भोकरदन तालुक्यातील तीन युवकांनी रमजाण महिण्यात २७ व्या दिवशीचा रोजा धरून हिंदु मुस्लिम एक्याचे दर्शन घडुन दिले.या युवकांनी मुस्लिम नियमाप्रमाणे सकाळी ४ ला ते ७:२० पर्यंत रोजाचे सर्व नियम पाळत अमन ग्रुपच्या इफ्तार पार्टीत रोजा सोडला..

  हिंदु मुस्लिम असा कुठलाही जात भेद न समजता १२ जुन रोजी रमजान महिण्यातील पविञ २७ वा रोजा तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथिल नारायण लोखंडे,संदिप लोखंडे,सोयगाव देवीचे मधुकर सहाने या तीन युवकांनी नियमचे पालन करू सकाळ पासुन रोजा धरला.हिंदु मुस्लिम ऐकतेचा संदेश दिला आहे. भोकरदन तालुक्यात हिंदु युवकांनी ठेवलेल्या या रोजा बद्दल सर्वञ कौतुक होत असुन,अमन ग्रुपच्या वतीने या युवकांचा सत्कार करण्यात आला,व ७:१५ ला नियमानुसार अमन ग्रुपने ठेवलेल्या इफ्तार पार्टीत रोजा सोडण्यात आला यावेळी.आसिफ कुरेशी,अमन ग्रुपचे उपाध्यक्ष याकूब मन्सुरी,सचिव इरफान पठान ,झाहेद शेरा,मुक्तार शेख,निसार शेख,इसरार पठाण,अशपाक शेख,नासेर भाई,जावेद शेख,साबेर रजा,शेख सलिम,बंडु जाधव,अदिसह अमन ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
फोटो ओळी : पविञ रोजा पकडलेल्या युवकांचा सत्कार करतांनी अमन ग्रुपचे पदाधिकारी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें