आरोग्य केंद्रच बनले आरोग्यास हानिकारक.जोगवाडा आरोग्य केंद्र घाणीच्या विळख्यात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 जून 2018

आरोग्य केंद्रच बनले आरोग्यास हानिकारक.जोगवाडा आरोग्य केंद्र घाणीच्या विळख्यात.

आरोग्य केंद्रच बनले आरोग्यास हानिकारक.जोगवाडा आरोग्य केंद्र घाणीच्या विळख्यात...



*जिंतूर/ निशाद आहेमद*

जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील आरोग्य केंद्र हेच रुग्णाच्या आरोग्यास हानिकारक असल्याचे चित्र जोगवाडा येथील आरोग्य केंद्रात गेल्यानंतर पहावयास मिळते आहे.. एरव्ही गावातील व परिसरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचा संदेश देणारे आरोग्य केंद्र हे स्वतःबाबत मात्र पूर्ण अस्वच्छ असल्याचे बघावयास मिळत आहे.. आरोग्याची इमारती पूर्णतः सांडपाण्याने व्यापली असून या आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण हे उपचार घेण्यासाठी न येता, रोग वाढवण्यासाठी येत असल्याचे दिसत आहे... मागील आठवड्यातच आरोग्य केंद्रा मार्फत पावसाळ्यात होणारे रोग,व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती देण्यात आली.. मात्र याबाबत आरोग्य विभाग स्वतः किती सुज्ञ आहे हे जोगवाडा आरोग्य केंद्रास भेट दिल्यानंतरच कळते.. आरोग्य केंद्रच्या दारावरच पाण्याचे मोठे डबके साचले असून या पाण्यावर विविध प्रकारचे डास, आजूबाजूची कुत्री, डुकरे,इत्यादी प्राणी घाण करत आहेत... तरी याबाबत आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांसह परिसरातील रुग्णांकडून होत आहे...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें