पत्रकारांच्या इफ्तार पार्टीत मौलवी, महाराज,व्यापारी आले एकत्र.
सामाजीक एकोप्यात झाली वाढ.
जिंतूर :(अजमत पठाण) :- शहरासह तालुक्यातील मुस्लीम बांधव व इतर सर्व समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांसाठी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ विद्यमाने गुरुवार 4 जून रोजी शहरातील पत्रकार भवनामध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मौलवी, महाराज,प्रतिष्टित नागरिक,व्यापारी,सामाजीक संघटनेचे पदाधिकारी एका मंचावर राहून मानवतेचा संदेश दिल्याने सामाजिक एकोप्यात वाढ झाली आहे.
समाज उन्नतीसाठी समाजाला आपले कार्यक्षेत्र मानून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सतत झटत असणाऱ्या पत्रकारांच्या वतीने समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी मुस्लिम समाजातील पवित्र रमजान महिण्याचे औचित्य साधून तालुक्यातील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ तालुका विद्यमाने सर्व समाज बांधवांकरिता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मुफ्ती कलीम बेग, मौलाना तजम्मुल अहमद खान, मौलाना रसूल, मौलाना सिराज,यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर एकत्रित आल्याने इफ्तार पार्टीत सामाजिक एकोप्याची भावना निर्माण झाली होती. शिवाय इफ्तार पार्टीस पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल कांबळे, निरीक्षक प्रवीण मोरे,नायब तहसीलदार परमानंद गावंडे,स पो नी अहेमद शेख,व्यकटेश आलेवार,
प्रतिष्ठित व्यापारी सुनिल तोष्णीवाल, ब्रिजगोपाल तोष्णीवाल,प्रदीप चव्हाण,प्रदीप देशमुख,रमेश दरगड, सत्यनारायण शर्मा,ऍड मनोज सारडा,संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे, ऍड गोपाळ रोकडे, ,डॉ इरफान,डॉ आगाई पटेल, सुदर्शन अच्छा,यांच्यासह सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीने सामाजिक एकोप्याचे वातावरण निर्माण झाले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें