उपळीच्या पुल बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार - आ.अब्दुल सत्तार; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 25 जून 2018

उपळीच्या पुल बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार - आ.अब्दुल सत्तार;


आ.अब्दुल सत्तार यांच्याकडून पुलाची पाहणी;


सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.२५ ) -
सिल्लोड तालुक्यातील उपळी गावाजवळील अंजना नदीवरील पुल ढगफुटीमुळे पुरात वाहून गेला असुन नव्याने पुल बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पुलाची पाहणी करीत असतांना माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी उपळी येथील ग्रामस्थांशी बोलतांना सांगितले.
शनिवारी ( दि.२३) सायंकाळी पिशोर परिसरात ढगफुटी झाल्याने अंजना नदीस जोराचा पुर येऊन उपळी नदीवरील पुल दोन्ही थडा खचून वाहून गेला आहे.
पुल वाहून गेल्याने उपळी, भराडी, लोणवाडी, पळशी, मांडगाव, आदी गावांचा संपर्कच तुटला असुन या गावातील नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी उपळी गावाजवळील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना तात्काळ पंचनामा करण्यासंबंधी सुचना देण्यात आल्या.
नव्याने पुल बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उपळी येथील ग्रामस्थांना सांगितले.
उपळी गावाजवळील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर,उपसभापती नंदकिशोर सहारे, माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, काकाराव गुरुजी कळम, शांतीलाल अग्रवाल, सतिश ताठे, नाना कळम, सुखदेव जिवरग, गुलाबराव मिरगे, रतन मिरगे, सुभाष जाधव, जगन्नाथ कुदळ, काशिनाथ सुरडकर, जनार्धन सेजुळ, मच्छिंद्र सेजुळ, राजेंद्र सुरडकर, प्रवीण शेजुळ,योगेश फोलाने, गणपत औटे, ऋषीकेस सेजुळ, विठ्ठल गायकवाड, कल्याण पांढरे, सुभाष शेजुळ, शंकर शेजुळ,रामराव फोलाने, विठ्ठल पांढरे आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें