मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद निमित्त सिल्लोड बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 जून 2018

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद निमित्त सिल्लोड बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी.

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद निमित्त सिल्लोड बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी.


शेख कलीम
सिल्लोड प्रतिनिधी:
 झाली होती. कापड दुकांनासह सुकामेव्यांची दुकाने गर्दीने फुलली होती. रमजाननिमित्त शेवयांना सर्वाधिक मागणी असून, त्याखालोखाल काजु, बदाम, मणुके, असा सुकामेवा खरेदी केला जात होता.
मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्याला (१७ ) मेपासून सुरुवात झाली. या महिन्यात अत्यंत कडक उपवास पाळले जातात. या महिन्यामध्ये सुका मेवा, मिठाई, फळे, खजूर यांची मागणी वाढते, त्यामुळे शहरातील अल्लामा एकबाल चौक,शाहिद भगतसिंग चौक,सराफा बाजार , कापड बाजार अशा विविध ठिकाणी खाद्यपदार्थांची दुकाने सजली आहेत.आता रमजान ईद जवळ आल्याने या सणाचे स्वागत करण्यासाठी मुस्लिम बांधवांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
या सणाच्या पार्श्वभूमिवर शहरात बाजारामध्ये नवीन कपड्यांसह अत्तर, शेवया, सुकामेवा खरेदीसाठी गर्दी झाली होती. रमजान ईदचे वैशिष्ट्य असलेल्या शिरखुर्म्यासाठी विविध प्रकारच्या शेवया खरेदी केल्या जात होत्या. या शेवया १०० ते १३० रुपये किलो दराने विकल्या जात होत्या. याशिवाय बदाम, पिस्ता, काजू, खोबरा किस, विलायची, मणुका यांनाही मागणी होती. ईद सणासाठी रेडिमेड कपड्यांची खरेदी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें