आ.मोहन फड यांच्यावतीने १२३ रुग्ण उपचारासाठी मुंबईस रवाना.सौ.मेघाताई फड यांनी दिला रुग्णांना निरोप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 जून 2018

आ.मोहन फड यांच्यावतीने १२३ रुग्ण उपचारासाठी मुंबईस रवाना.सौ.मेघाताई फड यांनी दिला रुग्णांना निरोप.

आ.मोहन फड यांच्यावतीने १२३ रुग्ण उपचारासाठी मुंबईस रवाना.सौ.मेघाताई फड यांनी दिला रुग्णांना निरोप.

मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.१४: आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा
मानणारे पाथरी मतदारसंघातील लोकप्रिय मा.आमदार श्री.मोहनभाऊ फड
यांच्या वतीने आज दि.१४ जुन रोजी पाथरी मतदारसंघातील मौजे सयद मिया पिंपळगाव , कार्ला ,कन्सूर ,लोणी  या गावातून एकूण १२३ विविध आजाराचे  रूग्ण मुंबई येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटल नेरुळ नवी मुंबई येथे मानवतरोड येथून तपोवन एक्सप्रेसने उपचारासाठी रवाना करण्यात आले.मा. डॉ. विजय पाटील साहेब व मा मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी श्री.ओमप्रकाशजी शेटे साहेबांच्या सहकार्याने या रुग्णांवर उपचार होणार आहे यावेळी रुग्णांना मानवतरोड रेल्वेस्टेशन येथे निरोप देण्यासाठी आ.मोहनभाऊ फड यांच्या पत्नी सौ.मेघाताई मोहनराव फड हे यावेळी रुग्णांना निरोप देण्यासाठी आवर्जुन उपस्थीत होत्या  तसेच यावेळी बापू जाधव ,सुरेश भूम्रे ,
आरोग्यसेवक पप्पू नखाते ,अमर शिंदे ,महादेव  नवघरे ,समाजसेवक बाबा शेख आदी यावेळी  उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें