राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा अघोषित संप,प्रवाशांचे हाल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 8 जून 2018

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा अघोषित संप,प्रवाशांचे हाल.

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा अघोषित संप,प्रवाशांचे हाल.

सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०८जून २०१८

एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी नाराजी असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यातील काही आगारांमध्ये अचानक 'काम बंद' आंदोलन सुरु केले आहे. पुरूषोत्तम मासानिमित्त धार्मिक उपक्रम निमित्त  देवदर्शनासाठी व विवाह समारंभास जाऊ ईच्छीनाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, हा कुठल्याही अधिकृत संघटनेने पुकारलेला संप नसून कर्मचाऱ्यांनी तो उत्स्फुर्तपणे पुकारला आहे.
भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे येथे मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले आहेत; सोनपेठ, परळी, बीड येथून आज पहाटे पासून स्थानकातून एकही गाडी आगाराबाहेर पडली नाही. अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचेही मोठे हाल होण्याची शक्यता आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें