एसटी महामंडळाच्या वतीने पूकारण्यात आलेल्या संपावर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
जिंतूर:(पठाण अजमत) अजून एकदा एसटी महामंडळाच्या संघटनांन कडून पुकारण्यात आलेल्या संपामूळे वाहतूक ठप्प झाली आहे.त्याच पद्धतीने खासगी वाहतूकदार मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लूट करत असल्याचे दिसून आले आहे .........
हे खासगी वाहनचालक मोठ्या प्रमाणात प्रवाशांची अडवणूक करीत आहेत.........
एस्टीच्या कामगारांच्यावतीने अचानक काम बंद आंदोलन करण्यात आले परभणी जिल्ह्यातही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले ....
सकाळपासूनच पाथरी आणि गंगाखेड या आगारातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने अचानक काम बंद आंदोलन पुकारल्याने येथील बस अगाराचा कारभार विस्कळित झाला.
संपामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल झाले असुन अनेक प्रवासी आगारात ताटकळत बसले आहेत. आगारात बसेसच्या रांगा लागल्या आहेत.
खाजगी वाहतुकीचे तिकीट दर वाढले संपामुळे अनेक प्रवाश्यांनी खाजगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडला. मात्र खाजगी प्रवासी वाहकांनी तिकीट दर दुप्पट केले आहेत. वाहतुक करणा-या रिक्षा, जीप यांनी 40 रूपये असताना आज मात्र 100 रूपये घेत होते तरचे भाडे 100 येवजी 200 आकारले जात आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें